जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा येथे संविधान दिन साजरा * विद्यार्थ्यांना संविधान उद्देशिकेचे वाटप

जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा येथे संविधान दिन साजरा 
* विद्यार्थ्यांना संविधान उद्देशिकेचे वाटप
मेहकर : (एशिया मंच न्यूज )
       जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, डोणगाव येथे 26 नोव्हेंबर 2025  रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सद्दाम शाह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
        कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक शेख रब्बानी सर यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे विद्यार्थी वर्गांना विविध उदाहरण देत महत्व पटवून सांगितले. तदनंतर शाळेतील विद्यार्थ्यांना संविधान उद्देशिकेची प्रत सद्दाम शाह यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. यावेळी मराठी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजू जाधव हे देखील उपस्थित होते.
      यावेळी सद्दाम शाह यांनी आपले विचार व्यक्त करीत उपस्थितीत विद्यार्थ्यांना सांगितले की, संविधानाने प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र्याने जगण्याचा हक्क दिला आहे. सोबतच त्यांनी संविधानातील समानता, न्याय, बंधुता, आणि स्वतंत्रतेच्या तत्त्वांची महती सांगितली. विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ घेतांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून दिली.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक अनवर अहमद यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहात संविधान दिवसाच्या संकल्पनेला स्वीकारले असून आपली भविष्यवाणी कर्तव्ये योग्य रीतीने पार पडण्याचा संकल्प केला.
        संविधान दिवस साजरा केल्याने विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या इतिहासाबद्दल त्याच्या उद्देशिकेची माहिती अधिक चांगली झाली. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाच्या तत्त्वांची जाणीव निर्माण होणे, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते.

* डोणगाव येथे संविधान दिन उत्सवात साजरा : 
      26 नोव्हेंबर 2025 रोजी 76 वा संविधान दिन जि. प.केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा डोणगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10:30 वाजता शालेय परीपाठ झाल्यावर भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन बालप्रसाद आखाडे (अध्यक्ष शा.व्या.समिती जि. प. शाळा डोणगाव मुले), राजेश जाधव (शा.व्य. समिती सदस्य), सद्दाम शाह कटू शाह (अध्यक्ष शा.व्या.समिती उर्दू शाळा डोणगाव ) यांच्या हस्ते करून  मान्यवरांच्याहस्ते भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करून विद्यार्थ्यांना वाटप केले. तद्नंतर गावातून संविधान रॅली काढून संविधांनावर आधारित विविध मूल्यांची जोपासना करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी स्वातंत्र्य ,समता , बंधुता न्याय व प्रेम , राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्ती या सामाजिक व राष्ट्रीय मूल्यांवर आधारित गावातून सर्व भारतीयांना संदेश दिले.
       सदर कार्यक्रमाला आयुब शाह, नाझीम कुरेशी, जावेद शाह यांच्यासह पालक वर्ग व समिती सदस्य हजर होते. उपस्थितीत मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आयोजित विविध शालेय स्पर्धेत  चित्रकला, सुंदर हस्ताक्षर सहभाग घेतला. सोबतच  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांनी उपस्थितीतांचे लक्ष वेधले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  मुख्याध्यापक व शिक्षवृंदानी परिश्रम घेतले.