जगल्याच्या भूमिकेतून घेतली मशाल हाती!

जगल्याच्या भूमिकेतून घेतली मशाल हाती!
बुलढाणा : (गणेश निकम केळवदकर : एशिया मंच न्यूज )

 चांदणे पेरीत आलो,
अंधारल्या वाटेत मी,
ध्यास हा मनी सदैव, 
समतेचा पाईक मी!
चोहीकडे असल्या जरीही 
विकृतींच्या काळराती..
जागल्याच्या भूमिकेतून,
घेतली "मशाल" हाती!


          समाजातील दिनदुखीतांच्या प्रत्येक सुखदुःखात धाऊन जाणारे व मिञपरिवारासाठी सदैव दिपस्तंभासारखे असणारे सुनील सपकाळ यांना यावेळी नगर पालिका सभागृहात पाठववायचेच हा संकल्प त्यांच्या मिञपरिवाराने केला आहे. निवडणुका आले की लोक निवडणुकीमध्ये उतरतात व काही दिवसांसाठी कामाला लागतात. पुढे निवडणुका संपल्यानंतर की अशी माणसं आली तशी निघून जातात. यातून मतदारांचा मोठा भ्रमनिराश होत असतो. राजकारण असेच असते असे सर्व म्हणतात, मात्र गेल्या 25 वर्षापासून अहोरात्र समाज सेवेत असणाऱ्या, कायम जमिनीवरचे सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख निर्माण केलेल्या सुनील सपकाळ यांना यंदाची निवडणूक दिलासादायक ठरण्याची चिन्हे आहे. प्रभागातून मिळणारा मतदारांचा प्रतिसाद, केव्हाही हाक द्या, सदैव हाकेला तत्पर असणारा त्यांचा स्वभाव, अनेकांना भरभरून केलेली मदत यामुळे निवडनुक त्यांची असली तरी मित्र परिवार व कार्यकर्त्यांनी ती हाती घेतली आहे.
           बुलढाणा शहरामध्ये नवा विचार देण्याचे काम नेहमीच प्राध्यापक सुनील सपकाळ यांनी केले आहे. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सर्व धर्मांना जोडणारा शिवमहोत्सव त्यांनी सुरू केला. हा महोत्सव आज राज्यातील एक महत्त्वपूर्ण महोत्सव झाला आहे. केवळ शिवजयंती पुरते त्यांचे कार्य सीमित आहे, असे नाही तर लोकमंच या विचार पिठाच्या माध्यमातून डॉक्टर शोन चिंचोले यांच्या अध्यक्षतेखाली सातत्यपूर्ण नवनवीन उपक्रम राबवले जात आहे. लोकमंचचे ते कार्यकारी अध्यक्ष आहे. यातून बुलडाणेकराना वेगळा विचार देण्याचा प्रयत्न झाला. शैक्षणिक क्षेत्रातला गाढा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पिढी घडवण्याचे काम करणारा हा माणूस विद्यार्थ्यांमध्ये कायम रमलेला असतो. सामाजिक कार्य करत असताना शैक्षणिक कार्यातही कधी त्यांनी मागे पाहिले नाही. ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्याला प्रामाणिक न्याय देणे हे त्यांनी केले आहे. दीर्घकाळ राजकीय परिघात राहिल्यामुळे नगरपालिका आणि एकूणच प्रशासनातील बारकावे त्यांना चांगलेच ज्ञात आहेत. ज्यांचा अभ्यास दांडगा असतो अशी माणसे कुठल्याही प्रश्नाला सहज न्याय देऊ शकतात. प्रश्न सोडवण्यासाठी सखोल ज्ञान आणि अनुभव तितकेच आवश्यक ठरते. हा महत्त्वाचा गुण त्यांच्याकडे असल्याने ते प्रशासकीय पातळीवर देखील इतरांपेक्षा उजवे ठरतात.
           वार्डातील सर्व धार्मिक स्थळांना आवश्यक सुविधांसाठी निधी पुरविणे, रामनगर परिसरातील अतिक्रमाणाच्या नावाखाली बांधकामे पाडून सामान्य नागरीकांना त्रास देणा-या मस्तवाल सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखविने, सामान्य नागरीकांच्या मालमत्तांना संरक्षण, कधी कुठे झाला नसेल असा शहराच्या इतिहासात प्रथमच वार्ड स्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन, संविधानिक चौकटीत राहुन लोकशाही मुल्य जोपासण्यासाठी कला-कौशल्य - श्रध्दा - उपासना या सर्वांना व्यासपीठ देण्यासाठी प्रभाग 15 मधून यंदा ते नगरसेवक पदाची निवडणूक लढवीत आहे. मनमिळावू स्वभाव , फर्डे वक्ते व जमिनीवर पाय ठेवून चालणारा माणूस अशी सुनील सपकाळ यांची कायम ओळख राहिली. कितीही चर्चा करा उत्तर हसूनच, कटूता तर नाहीच. राजकीय पदे मिळो न मिळो सामाजिक सेवेत हा माणूस गेल्या  25 वर्षापासून सातत्याने टिकून आहे, ही मोठी गोष्ट आहे. ज्याला समाज व सामाजिक कार्य दिखाव्यापुरते सांगण्याची गरज नाही. निवडणुकांपुरते राजकारणात पुढे यायचे आणि नंतर सर्व काही सोडून मोकळे व्हायचे अशातला स्वभाव त्यांचा कधीच राहिला नाही. जिल्ह्यातील मोठ्या राजकारण्यांमध्ये त्यांची नेहमीच उठबस राहिली. कुठलीही निवडणूक असली की हा माणूस इतरांच्यासाठी अंग झटकून पुढे ... अनेकांना लाभाची पदे मिळवून देण्यात सिंहाच वाटा उचलणारे सुनील सपकाळ यांच्यासाठी आता परतफेड करण्याची संधी आली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व सहकारी व प्रभागातील व्यक्ती यांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, कार्यकर्ते , काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सहकारी पक्षांचे चांगले सहकार्य देखील त्यांना मिळत आहे. जोडीला वार्डातील सक्षम उमेदवार आहे.
           राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात मात्र या व्यक्तिमत्त्वाविषयी आरोप करतानाही विरोधकांना दहा वेळा विचार करावा लागतो. कधीही कोणाचे मन दुखवणार नाही अशा पद्धतीने मृदू भाषि असणारे सुनील सपकाळ नगर परिषदेच्या सभागृहात जाणे केवळ प्रभागापुरते नाही तर शहरासाठी, अनेक समाज घटकांच्या निकोप वाढीसाठी आणि जाज्वल्य शिव विचारांसाठी सुद्धा भूषणावर ठरणार आहे.