बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील स्थानिक राजे छत्रपती महाविद्यालय येथे भारतीय संविधान दिन राज्यशास्त्र अभ्यास यांच्या वतीने आज 26 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश मेश्राम हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सागर पवार व सचिन शेळके हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. भगवान गरुडे यांनी केले. याप्रसंगी संविधान दिनाचे महत्त्व संविधान दिलेले अधिकार व कर्तव्य यावर आपले विचार मांडले तसेच सागर पवार यांनीही कामगार व महिलांविषयी बाबासाहेबांचे विचार व कार्य याविषयी विचार मांडले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी भारतीय संविधानाची प्रासंगिकता व बाबासाहेबांचे विचार यावर प्रकाश टाकला. यावेळी मंचावर प्रा. शशिकांत शिरसाठ, डॉ .स्वप्नील दांदडे, महादेव रिठे, डॉ.शहेदा नसरीन, डॉ.कामिनी मामरडे , डॉ. नितीन जाधव, डॉ. सुनील पवार, प्रा नागरे यांच्यासह असंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सारिका बडे हीने केले.
