निवडणूक संदर्भात शरद पाटील यांची पत्रकार परिषद
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज ) नगर परिषद निवडणुकी संदर्भात उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी स्थानिक नगर परिषद येथे पत्रकार परिषदेचे आयोजन २९ नोव्हेंबर रोजी केले होते. यावेळी शरद पाटील यांनी सांगितले की, बुलढाणा नगर परिषदेसाठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे.
बुलढाणा शहरात ७६ मतदान केंद्रांवर मतदान केले जाणार आहे. पुर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी ३९७ कर्मचाऱ्यांच्यांची नेमणूक करण्यात येईल. ३२ मतदान केंद्रावर महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी विद्यालय बुलढाणा येथे सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. या सखी मतदान केंद्रावर सर्व महिला कर्मचारी असणार आहे. प्रत्येक बुधवर सीईओ आणि दोन बीईओ असणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या ईव्हीएम मतपत्रिकांवर गुलाबी रंग असेल तर दोन नंबरच्या मतपत्रिकांवर पांढरा तर तिसऱ्या वर निळा कलर असणार आहे. एका ईव्हीएम वर नगराध्यक्ष आणि प्रभाग दोन सदस्यांसाठी एक मशीन असणार आहे. मॉक पोलची चाचणी सकाळी ६.३० वाजता करणार आहे. ७ वाजल्यापासून मतदानाला
सुरुवात होऊन सायंकाळी ५.३० वाजता बंद करण्यात येणार आहे. ५.३० वाजताच्या आधी गेट वर लाईन मध्ये आल्यास त्यांना मतदान करता येणार आहे. मतमोजणीच्या दिवशी आठ टेबलवर मतमोजणी होणार आहे. त्यामध्ये प्रथम ८ प्रभागांची मतमोजणी झाल्यानंतर राहिलेल्या ७ प्रभागांची मतमोजणी करण्यात येईल. यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांची उपस्थिती होती.
