मविआच्या प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद* उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन ; रॅलीत नेत्यांची एकजुट

मविआच्या प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद
* उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन ; रॅलीत नेत्यांची एकजुट 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या निमित्ताने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काँग्रेस पक्षाच्या लक्ष्मीताई दत्ता काकस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रभाग क्र. १५ अ चे उमेदवार संध्याताई राजेश ठोंबरे, प्रभाग क्र. १५ ब चे उमेदवार सुनील प्रतापराव सपकाळ यांना बहुमताने विजयी करण्यासाठी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीत नेत्यांची एकजूट दिसून आली.

        यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, पक्ष प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, शिक्षक पदवीधर मतदार संघाचे आ. धीरज लिंगाडे, काँग्रेस नेते संजय राठोड, शिवसेना जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके, जिल्हा संघटक डी.एस.लहाने, डॉ. पुरुषोत्तम देवकर, हेमंत खेडेकर, ऍड. विजय सावळे, ऍड. नंदू साखरे, अशोक गव्हाणे, तालुकाप्रमुख विजय इतवारे, गजानन धांडे यांच्यासाह मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक उपस्थित होते!