प्रभाग १३ मध्ये कोण बाजी मारणार : मतदारांमध्ये उत्सुकता !

प्रभाग १३ मध्ये  कोण बाजी मारणार :  मतदारांमध्ये उत्सुकता !
​मलकापुर : (एशिया मंच न्यूज )
        आगामी नगरपालिका निवडणुकीमुळे सर्वत्र राजकीय वातावरण तापले असून, प्रत्येक प्रभागात नागरिक आपल्यासाठी योग्य उमेदवाराच्या शोधात आहेत. यात प्रभाग १३ हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या प्रभागात काही उमेदवारांची बाजू भक्कम दिसत असली तरी, मतदारांच्या मनात अद्यापही काही प्रमाणात संभ्रमावस्था असल्याचे चित्र आहे.
​प्रभाग १३ च्या निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी नवीन उमेदवारांना संधी दिली आहे, ज्यामुळे लढत अधिक चुरशीची होणार आहे.

​ या प्रभाग 13 मध्ये ​भारतीय जनता पार्टी (BJP): शेख इम्रान शेख अझीज ऊर्फ 'बॉस',  सौ. प्रियंका राहुल भोपले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC): शहजाद खान सलीम खान, मेमन (महिला उमेदवार), एआईएमआईएम: दानिश शेख, 
​राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट): मोहम्मद हारिस सुपडू,  नवाब (महिला उमेदवार), उमेश वैष्णव बैरागी- शिवसेना (शिंदे गट), 
​अपक्ष उमेदवार: नझीर उल्लाह खान, येवतकर कुणाल मिलिंद- अपक्ष हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

        ​प्रभाग १३ हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे, कारण हा प्रभाग भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवाराचा प्रभाग आहे, तसेच एआईएमआईएम चे जिल्हाध्यक्ष ही  या प्रभागामध्ये निवडणूक लड़त आहे,  त्यामुळे या प्रभागाच्या निकालाकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे.

* ॲड नावेद खान यांच्या भूमिकेची उत्सुकता

       ​या सर्व उमेदवारांच्या नावांमध्ये, प्रभाग १३ मध्ये मोठा प्रभाव असलेले ॲड. नावेद खान यांच्या उमेदवारीची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत होती. मात्र त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय अनिश्चिततेत भर पडली आहे. ॲड. नावेद खान हे आता कोणत्या उमेदवाराला किंवा पक्षाला पाठिंबा देऊन कोणती भूमिका घेतात, यावर प्रभाग १३ चे राजकीय भवितव्य अवलंबून राहील, असे बोलले जात आहे.
         ​येत्या २ डीसेंबर २०२५ ला मतदान होणार असून ३ तारखेला मतमोजणीनंतर सर्व उमेदवारांचे नशीब स्पष्ट होईल. ​प्रभाग १३ मधील नागरिकांमध्ये योग्य उमेदवाराच्या निवडीबद्दल उत्सुकता असून मतदार राजा आपला कौल कोणाला देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.