* बुलढाणा जिल्ह्याला 3 सुवर्ण, 2 रौप्य, 3 कास्य पदक
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र व पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ५ व्या पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धांची शिवाजी विद्यापीठ येथील सिंथेटिक मैदानावर उत्साहात सांगता झाली.
या स्पर्धेत बुलढाण्याच्या पॅरा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उंचावले. या स्पर्धेत बुलढाणा च्या खेळाडूंनी एकूण 8 पदके जिंकून आपली ताकद दाखवून दिली. यामध्ये 3 सुवर्ण, २ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.
पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष नंदकिशोर नाळे यांनी सर्व खेळाडूंचे स्वागत केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच बुलढाणा पॅरा ओलंपिक असोसिएशन च्या वतीने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त अनुराधा सोळुंकी यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंनी पाचव्या राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक स्पर्धेत सहभागी होऊन जिल्ह्याला आठ पदके प्राप्त करून दिले. विशेष महाराष्ट्र पॅराऑलम्पिक च्या वतीने कुमारी अनुराधा सोळंकी यांनी तिथे ऑफिशियल म्हणून काम केले. त्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंची पदक प्राप्त यादी
सौ.अलका चव्हाण भाला, गोळा फेक सुवर्णपदक, शुभम अवचार यांना भाला व गोळा मध्ये सुवर्ण व रोप्य पदक प्राप्त, राजू रोकडे यांना रोप्य व कास्यपदक, गणेश जाधव यांना सुवर्ण व कांस्यपदक मिळाली. तसेच चैतन्य उगले, किरण जाधव यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पॅराऑलिम्पिक असोसिएशन बुलढाणा गणेश जाधव सर यांनी टीमचे हार्दिक अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
