बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची नियोजनात्मक बैठक बुलढाणा येथील राष्ट्रवादी भवनमध्ये शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली.
बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, पक्ष प्रवक्त्या लोकनेत्या जयश्रीताई शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, दिलीप जाधव, बी.टी जाधव, संदीपदादा शेळके, डी. एस. लहाने ,पी.एम जाधव यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी लखन गाडेकर, सुनील तायडे, सुमित सरदार, तुळशीराम काळे, गजानन धांडे, विजय इतवारे, डॉ.शरद काळे, अशोक गव्हाणे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
