बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
बुलढाणा शहरात दलित, मुस्लिम समाजाचे या निवडणुकीत होणाऱ्या टक्केवारी नुसार १२ ते १३००० हजार मतदान होणार आहे. या मतांवर डोळा असलेला सत्ताधारी पक्ष दलित, मुस्लिम समाजाचे मते विकत घेण्यात व्यस्त आहेत, असा आरोप आझाद हिंद संघटनेचे संस्थापक ॲड. सतीश रोठे यांनी २७ नोव्हेंबर रोजी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत केला.
पुढे रोठे म्हणाले, मिलिंद नगर, मिर्झा नगर, इक्बाल चौक भागातील मतदारांची नावे ११ वॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांची पंचाईत होणार असून प्रचंड गोंधळ उडणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदार यादी प्रसिद्ध करीत हार्ड कॉपी उमेदवारांना वाटप करण्यात आली. यावर आम्ही हरकत घेत सुप्रीम कोर्टपर्यंत पोहोचलो.
बुलढाणा शहरातील मतदारांची नावे दुसऱ्या वॉर्डमध्ये समाविष्ट झाल्याने त्यांना मतदान बुथ लवकर मिळणार नाही. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होणार असल्याचा धोका ॲड. रोठे यांनी व्यक्त केला.
* आमची लढत सत्ताधाऱ्यासोबत
ॲड.सतीश रोठे यांनी सांगितले की, आमची लढत सत्ताधारी यांच्याशी आहे. मताची टक्केवारी कमी होणार असून शहरात एकूण 65 ते 70 हजार मतदार आहेत. यावेळी नगर पालिका निवडणुकीत ४० ते ४५ टक्के मतदान होणार असून आम्हाला विजयाची खात्री असल्याचे रोठे म्हणाले.
यावेळी सौ. उर्मिला रोठे, आझाद हिंदच्या सुरेखाताई निकाळजे, आशाताईं गायकवाड, कमलाकर व्यवहारे, वनिताताई रोठे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
