चिखली शहराच्या विकासासाठी युतीला बळ द्या* चिखलीकरांना अजितदादांचे आवाहन

चिखली शहराच्या विकासासाठी युतीला बळ द्या
* चिखलीकरांना अजितदादांचे आवाहन
चिखली : (एशिया मंच न्यूज )
        नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत चिखली येथील राजा टॉवर येथे २६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी उशिरा पार पडलेल्या परिवर्तन सभेला, नागरिक, युवक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी चिखलीच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युती च्या नगराध्यक्ष व सदस्य पदाच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्य मंत्री अजितदादा पवार यांनी केले. 
       पुढे बोलतांना ते म्हणाले की, महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य उभारले.चिखलीचा विकास सर्व समाजघटकांना सोबत घेऊनच करायचा आहे,  चिखलीतील पाणीपुरवठा, रस्ते, नाले, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांसाठी लागेल ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यास राज्य सरकार वचनबद्ध आहे. राजकारणात सत्ता उपभोगायला नसते, तर जनतेची सेवा करण्यासाठी असते, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. अजितदादांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण करून देत ते म्हणाले, चिखलीला आदर्श शहर बनवू, त्यासाठी पालिकेची सत्ता युतीच्या ताब्यात द्या, असे आवाहन केले.
        यावेळी सभेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना महायुती  शिवसेना शिंदे गटाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.  आमदार अमोल मिटकरी, आमदार मनोज कायंदे , विधान परिषद सदस्य संजय खोडके, जिल्हाध्यक्ष एड नाझेर काझी, जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष देव्हडे, मनोज दांडगे, भास्कर मोरे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष कपिल खेडेकर, रोहित खेडेकर, कैलास भालेकर, शहराध्यक्ष तुषार बोंद्रे, तालुका अध्यक्ष संतोष परिहार, उपजिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख, इरफान अली, युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष वसीम शेख, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माया ताई म्हस्के, शेखर बोंद्रे, संतोष लोखंडे यांचा समावेश होता, तसेच महायुतीचे सर्व उमेदवार, कार्यकत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.