बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे येत्या 24 ऑगस्ट रोजी संतनगरी शेगाव येथे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने 11 ऑगस्ट रोजी नांदुरा व खामगाव येथे तालुका आढावा बैठक घेण्यात आली. दरम्यान दोन्ही तालुका अध्यक्षांची नियुक्ती करून नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली.
संघटनेचे राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे, जिल्हाध्यक्ष किशोर पवार, जिल्हा सचिव विठ्ठल पाटेखेडे, बुलढाणा तालुका अध्यक्ष गजानन पडोळ यांच्या उपस्थितीत बैठकी झाल्या. यावेळी बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष सातव तर खामगाव तालुकाध्यक्षपदी रमेश जुमळे, नांदुरा तालुकाध्यक्षपदी रामविजय ढोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
नांदुरा कार्यकारणी मध्ये गोपाळराव गावंडे, मो.अलीम इस्माईल यांची उपाध्यक्षपदी, भागवत खंडारे कार्याध्यक्ष, विजय सोनग्रे सरचिटणीस, प्रवीण सातव, ज्ञानेश्वर इंगळे सहसचिव, राजमोहन पांडव संघटक, सुजित गुजर, दीपक सपकाळ सहसंघटक, शैलेंद्र पखाले सचिव, अफजल हुसेन यांची प्रसिद्धीप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
बैठकीला समाधान जाधव, निलेश कठाळे, धानोरे सर, अनिल कुटे, संजय पांढरे, गोपाल अवचार, विकास जाधव, भानुदास पाटेखेडे, गुणवंत मसने यांची उपस्थिती होती.