बुलडाणा अर्बन गणेश मंडळाचे कार्यकारणी जाहीर * संजयकुमार मुरलीधर राजगुरे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी प्रशांत श्रीराम काळवाघे यांची निवड

 बुलडाणा अर्बन गणेश मंडळाचे कार्यकारणी जाहीर 
* संजयकुमार मुरलीधर राजगुरे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी प्रशांत श्रीराम काळवाघे यांची निवड
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुलडाणा अर्बन परीवाराकडून बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झालेला असुन त्यामुळे नवचैतन्याची लहर मार्केटमध्ये दिसत आहे. मंडळाच्या वतीने यावर्षी दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे वतीने दरवर्षी गणेश उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
         बुलडाणा अर्बन मंडळाचे यावर्षी २४ वे वर्ष असून यावर्षी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेश उत्सावानिमित संस्थेने गणेश उत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक अनंताभाऊ देशपांडे कैलास बन्सीलाल कासट यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली.

            गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर अध्यक्ष संजयकुमार मुरलीधर राजगुरे तर उपाध्यक्षपदी प्रशांत श्रीराम काळवाघे, तर सचिवपदी श्रीकांत नागेश जोशी सहसचिव संजय मनोहर भागवत, कोषाध्यक्ष अनिल नारायण देशपांडे, सहकोषाध्यक्ष कैलास तुळशीराम निकम तर सदस्य सर्वश्री रविंद्र प्रभाकर कुलकर्णी , सचिन सुधाकर शास्त्री, विजय समाधान डोंगरे, अजय पारसमल तातेड, नरेंद्र शिवलाल शर्मा, अनिल वासुदेव महाले , अजय विजय क ऱ्हाळे, विक्रांत सराफ संजय अंबादास पाठक, निलेश सुरेशराव बनसोडकर, अरुण नारायण देशपांडे, मंगेश प्रकाश बनसोड, प्रशांत देविदासपंत घुसळकर, अनिल वासुदेव महाले, प्रशांत देविदास घुसळकर, सुधाकर शिवाजी मानवतकर, प्रशांत सखाराम भराड, परमेश्वर भगवान शिंदे,महेश गायगोळ, लक्ष्मीकांत दिपक वारे, सौ.प्रिती अनिरुद्ध कोलारकर, सौ. वर्षा कैलास खेर्डीकर, कु. सुनिता नारायण जाधव यांचा समावेश आहे. 
        बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचा  शहर व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार मुरलीधर राजगुरे, सचिव श्रीकांत नागेश जोशी व गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

* गणेशोत्सव मंडळाचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे : संस्थेच्या मुख्य कार्यालयात १४ ऑगस्ट  गुरुवार रोजी श्रींचे मंडप पूजन, तर संस्थेच्या मुख्य कार्यालयात २७ ऑगस्ट बुधवार रोजी मूर्ती स्थापना, गोवर्धन इमारतीमधील हॉल येथे २८ ऑगस्ट  गुरुवार अथर्वशीर्ष पठण/उपासना .
२९ ऑगस्ट शुक्रवार रोजी सायंकाळी ७ वाजता सहकार विद्या मंदिर, बुलडाणा चे सांस्कृतिक भवन येथे चला हवा येऊ द्या चा हास्य व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
       ३० ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी ३ वा. गोवर्धन इमारतीमधील पहिला मजला येथे पुरुष कर्मचारी एक मिनिट स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, तर ३ सप्टेंबर  शनिवार रोजी दुपारी ३ वा. गोवर्धन इमारतीमधील पहिला मजला  येथे महिला कर्मचारी एक मिनिट स्पर्धां होणार आहे. ३ सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी ११ वा. गोवर्धन इमारतीमधील पार्किंग येथे वृक्ष वाटप करण्यात येणार आहे. ४ सप्टेंबर गुरुवार रोजी कर्मचारी लाईव्ह ऑक्रेस्ट्रा, गोवर्धन इमारतीमधील हॉल, ५ सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी ११ वा. बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी येथे खास महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
तर श्रींचे विसर्जन मिरवणूक ६ सप्टेंबर शनिवार, दुपारी १२.३० वा. संस्थेच्या मुख्य कार्यालयातून निघणार आहे. गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचे बक्षीस वितरण व भंडारा  ८ सप्टेंबर सोमवारी सायंकाळी ७ वा. गोवर्धन इमारतीमधील हॉल येथे होणार आहे, तरी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा आस्वाद बुलडाणा शहरातील गणेश भक्तांनी घ्यावा, असे आवाहन गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणी च्या वतीने करण्यात आले.