मेहकरात रेकॉर्डब्रेक भव्य रोजगार मेळावा आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त उत्कर्ष फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

मेहकरात रेकॉर्डब्रेक भव्य रोजगार मेळावा
*4300 तरुणांची नोंदणी 
*५१ कंपन्यांचा सहभाग 
* ११२५ उमेदवारांना थेट नियुक्ती
*आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त उत्कर्ष फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
मेहकर :  (एशिया मंच न्यूज )
      शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त उत्कर्ष फाऊंडेशनच्या वतीने मेहकर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

        या रोजगार मेळाव्यात 3500 तरुणांनी ऑनलाईन नोंदणी तर 800 बेरोजगार तरुणांनी प्रत्यक्ष नोंदणी केली. एकूण 4300 तरुणांनी रोजगारासाठी अर्ज केले. रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या तरुणांपैकी 1800  उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग झाली. त्यापैकी 1125  उमेदवारांना थेट नियुक्तीपत्रे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या सोहळ्यात उमेदवारांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद झळकत होता.
       यावेळी आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की,  ज्यांना आज तात्काळ रोजगार मिळाला नाही, त्यांना विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत घडवून योग्य नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. परिसरातील प्रत्येक तरुणाला रोजगार मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे.

        या रोजगार मेळाव्यात ५१ नामांकित कंपन्या व विविध कार्यालयांचा सहभाग होता. आयटी, अभियांत्रिकी, औद्योगिक, बँकिंग, विक्री, सेवा आदी क्षेत्रांमध्ये हजारो संधी उपलब्ध करून दिल्यामुळे तरुणाईला उज्ज्वल भविष्याची नवी दिशा मिळाली. रोजगार मेळाव्याच्या या भव्य सोहळ्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस श्याम उमाळकर, राज्य उपाध्यक्ष लक्ष्मणदादा घुमरे, सह संपर्कप्रमुख छगनदादा मेहेत्रे, काँग्रेसचे ॲड. अनंत वानखेडे, उपजिल्हाप्रमुख प्रा. आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दत्ता घनवट, उपतालुकाप्रमुख रमेश देशमुख, मेहकर शहर प्रमुख किशोर गारोळे, माजी उपसभापती सतीश ताजने, गंगाधर खरात, विठ्ठल चव्हाण, भास्कर गवई, तेजराव घायाळ, गजानन मोरे, युवा सेना तालुका अधिकारी ॲड. आकाश घोडे, जिवन घायाळ, अमोल बोरे, प्रा. गजानन खरात, सागर पाटील, लोणार महिला आघाडी तालुका अध्यक्ष तारामती जायभाये, आरती दीक्षित, नगमा गवळी, महिला आघाडी शहर संघटक पौर्णिमा गवई, संजिवनी वाघ, आरती देशमुख, अनिता खरात, श्याम पाटील, गजानन राठोड, पंडीत बापू देशमुख, ॲड. संदीप गवई आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.

         या रोजगार मेळाव्याच्या यशस्वितेसाठी गोपाल गायकवाड, महेश गायकवाड, शुभम पानखेडे, अमोल मोरे, राजेश्वर गायकवाड (मॅनेजर, लेंड अ हॅण्ड इंडिया), प्रकाश पाटील (प्लेसमेंट ऑफिसर), मिनाक्षी अटकुलवार, थेवेश गुजरे, मिलिंद भैसारे, अंकित देशमुख, ऋतुंबरा लोगडे, ईश्वर मुंगले यांचे परिश्रम विशेष उल्लेखनीय ठरले.

        प्रास्ताविक शहर प्रमुख किशोर गारोळे यांनी केले. सूत्रसंचालन निवेदक अजीम नवाज राही यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रकाश पाटील यांनी केले.