शेतकऱ्यांपेक्षा मोदी सरकारला अमेरिकन व्यापाऱ्यांचा फायदा महत्वाचा* जयश्रीताई शेळके यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

शेतकऱ्यांपेक्षा मोदी सरकारला अमेरिकन व्यापाऱ्यांचा फायदा महत्वाचा
* जयश्रीताई शेळके यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      देशातील शेतकऱ्यांची काळजी करण्याऐवजी मोदी सरकारला परदेशी व्यापाऱ्यांचा कळवळा असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे. अमेरिकन व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी आपल्या बळीराजाचे कष्ट वाया घालणाऱ्या केंद्र सरकारचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी निषेध केला आहे.

       डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब' समोर नतमस्तक होत मोदी सरकारने परदेशातून आयात होणाऱ्या कापसावरील सीमा शुल्क रद्द केलं आहे. या निर्णयामुळे अमेरिकने  निर्यातदारांची तिजोरी भरणार आहे. मात्र त्याचवेळी भारतीय शेतकऱ्यांच्या शेतातील पांढरं सोनं मातीमोल होणार आहे. देशाच्या अन्नदात्यांचा जीव पोखरणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांच्या हिताची फिकीर नसल्याचे मत जयश्रीताई शेळके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.