बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
अंगणवाडी डिजिटलाझेशनच्या नावावर फेस रिकग्निशन सिस्टिमचा वापर करून अंगणवाडीत पोषण आहार पात्र लाखो लाभार्थ्यांना आहारा पासून वंचित ठेवण्याचे काम सरकार कडून केले जात आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयकाचे हे उघड उलंघन आहे, असा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी सरकारवर केला आहे.
अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाईल हे मुळातच ३ जी कमी क्षमतेचे व हलक्या दर्जाचे आहेत. गाव खेड्यात वाड्या वस्त्यांवर आधार कार्डा वरून लाभार्थ्यांचे फेस रिडिंग वेगवेगळ्या तांत्रिक अडचणीमुळे होत नाहीत. अनेक लाभार्थ्यांच्या जवळ स्वतःचे मोबाईल नाहीत. अनेकदा खेड्यात मोबाइलची रेंज नसते. त्यामुळे OTP येत नाही. अशा अनंत तांत्रिक अडचणींमुळे गरजू लाभार्थ्यांना आहारापासून वंचित रहावे, लागत आहे. सरकाने आधार कार्ड शिवाय लाभार्थ्यांना पोषण आहार वितरीत करावा जेणे करून गरजू लाभार्थ्यावर अन्याय होणार नाही. त्यासाठी FRS ची सक्ती अंगणवाडी सेविकांना करू नये. २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभर सीटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने काळी साडी अथवा काळी फित लावून विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात सूद्धा सीटूच्या वतीने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड, जिल्हा सचिव प्रतिभा वक्टे, कोषाध्यक्ष सरलाताई मिश्रा, उपाध्यक्ष मंदा डोंगरदिवे, बेबी दाते, माया वाघ, वनमाला वानखेडे, मिना नागरे, सुजाता गवई, निशा घोडे, अपेक्षा शिंगणे, अनिता खडसे, वर्षा शिंगणे, संगिता मादनकर, उषा जैवळ, शारदा इंगळे, पुष्पलता खरात इत्यादींनी दिली आहे.