बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
वननेस नर्सिंग स्कुल बुलढाणा यांच्या वतीने 19 ऑगस्ट रोजी शाळेच्या प्रांगणात दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून जल्लोष साजरा केला. कॉलेज मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणलेला गोपाळ काल्याचा प्रसाद एकत्र करून तो सर्वांना वाटण्यात आला. दहीहंडीच्या उत्सवात साहिल जाधव, करण हिवाळे, आशिष खंडारे, ॠषीकेश आराख, जिवन आराख, पवन ताळतोंडे, अमर आराख, अमित चव्हाण या विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी प्रचार्या पुजा तरमळे, प्रा.समिक्षा राऊत, पायल राठोड, चेतना इंगळे, सोहम राऊत, आशिष गायकवाड यांची उपस्थिती होती.