चिखली न.प. ची प्रारूप प्रभाग रचना जाहिर
* हरकती व सूचना नोंदविण्याचे मुख्याधिकारी यांचे आवाहन
चिखली : (एशिया मंच न्यूज ) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशिष्ट कालावधीत घेण्याची मिळाल्यामुळे राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवार कामाला लागले आहे. प्रशासकीय स्तरावर देखील निवडणुकीची लगबग पहायला दिसत असून सन २०२५ -२६ मध्ये होणाऱ्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी चिखली नगर परिषदेमार्फत तयार करण्यात आलेली प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयुक्त यांनी मंजूर केली आहे .
सदर प्रभागाचे प्रारूप रचना व त्याच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यासाठी व त्यावर हरकती व सूचना मागवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्यात आला
असून त्यानुसार प्रभागाच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना सोमवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२५ ते दिनांक रविवार ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंतचा आहे. या संदर्भात नागरिकांच्या काही हरकती व सूचना असतील तर त्यांनी नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधून हरकती व सूचना सादर कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत बिडकर यांनी सांगितले. आता ३१ ऑगस्ट पर्यंत किती हरकती दाखल होतात ते बघावे लागेल. त्यानंतर काय निर्णय होतो. या हाल-चाली बघता लवकरच निवडणूका जाहीर होतील अशी शक्यता आहे.