राज्यस्तरीय शाहीरी पोवाडा स्पर्धेत शाहीर डी.आर. इंगळे यांचा संच राज्यात प्रथम

राज्यस्तरीय शाहीरी पोवाडा स्पर्धेत शाहीर डी.आर. इंगळे यांचा संच राज्यात प्रथम
बुलढाणा :  (एशिया मंच न्यूज )
        लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमीत्ताने छत्रपती संभाजीनगर येथे प्रहार जनशक्ती महाराष्ट्र राज्य वतीने राज्यस्तरीय शाहीर पोवाडा स्पर्धेचे आयोजन 17 ऑगस्ट 2025 रोजी. एस. बी. कॉलेजच्या सभागृहात करण्यात आले होते.
       या स्पर्धेत राज्यातून 22 शाहिरी संचानी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रसिद्ध आंबेडकरी जलसाकार व लोककवी वामनदादा कर्डक बहुउद्देशिय प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष शाहीर डी.आर.इंगळे आणि संच यांनी सादर केलेल्या दर्जेदार पोवाडा शाहीरीला तज्ञ परिक्षकांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले. रोख 51,000 रु, स्मृतिचिन्ह आणि प्रशिस्तीपत्र असे बक्षीसाचे स्वरूप आहे. माजी मंत्री बच्चु कडु यांच्या प्रहार जनशक्ती महाराष्ट्र शाखेने आयोजित केलेल्या स्पर्धेत बुलढाण्याचे शाहीर डी.आर. इंगळे यांच्या संचात सहकारी म्हणुन मोहन सरकटे, धम्मरतन गवई, प्रमोद गवई, भास्कर जाधव, मल्हारी गवई, श्रीकृष्ण सुरडकर, गणेश गायकवाड या कलावंतानी उत्कृष्ट साथ-संगत केली.            या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन महाराष्ट्रातील ख्यातनाम शाहीरी तज्ञ राजु राऊत, कोल्हापुर आणि शाहीर संतोष सांळुंके, लातुर यांनी काम पाहीले. माजीमंत्री बच्चुभाऊ कडु यांचे हस्ते बक्षिसाचे वितरण झाले. याप्रसंगी सभास्थानी शाहीर राजेंद्र कांबळे, शाहीर सुरेश जाधव, शाहीर गुलाबराव नळणीकर, शाहीर शिवराज शिंदे, शाहीर मुरलीधर हंबरडे, शाहीर अजय शेवाळे, सुधाकर शिंदे, कुणाल राऊत इत्यादी हजर होते. राज्यस्तरीय शाहीरी स्पर्धेत शाहिर इंगळे प्रथम आल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.