अनंता मिसाळ यांची कृषी भूषण पुरस्कारासाठी निवड

अनंता मिसाळ यांची कृषी भूषण पुरस्कारासाठी निवड
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        अत्यंत महत्वाचा समजला जाणारा राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कारासाठी भादोला येथील आनंता मिसाळ यांची निवड एका पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
       तेजस बहुउद्देशिय सामाजिक संस्था नाशिक यांच्या संस्थापक अध्यक्ष मेघा डोळस यांनी पुरस्कारासाठी निवड समितीची स्थापन केली होती, त्या समितीने आनंता मिसाळ यांच्या साहित्य कार्याची दखल घेत त्यांची राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे. सदर पुरस्कार हे 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक राजकमल लॉन्स, विठुराज पेट्रोल पंपच्या मागे बारागाव पिंप्री रोड सिन्नर नाशिक रोड येथे आयोजित करण्यात आले आहे.