* फास्टटॅग बंद असल्याने प्रवाशी त्रस्त
बुलडाणा : (एशिया मंच न्यूज )
स्थानिक आगाराच्या एस.टी.बसला लागले ग्रहण बुलढाण्याहून अमरावतीकडे निघालेली एस.टी. बस फास्टट्रॅक बंद असल्यामुळे प्रवाशी यांना बाळापूर जवळ असलेल्या टोल नाक्यावर एक ते दीड तास प्रवाशांना थांबवून नाहकचे त्रास सहन करावे लागले. याच एस. टी. बस मध्ये बुलढाणा येथील पत्रकार यांनाही नाहकचा त्रास सहन करावा लागला. त्यांना बाळापूर येथे नातेवाईक यांच्या अंतिमसंस्कार ला पोहचयाचे होते. परंतु बुलढाणा एस. टी बस आगाराच्या हलगर्जी पणामुळे त्यांना नाहकचा त्रास सहन करावा लागला. बाळापूरच्या प्रवाशी यांना दुसरी एस. टी. बस मध्ये जावे लागले.
बुलढाणा आगाराची एस.टी.बस दुपारी 12 वाजता सुमारे अमरावतीकडे निघाली होती. या बसमध्ये अंदाज 40 ते 50 प्रवासी होते. दरम्यान बालापुरच्या जवळ एका टोलनाक्यावर बस थांबली टोलनाक्याचे कर्मचाऱ्यांनी बसच्या ड्रायव्हरला सांगितले की, तुमची बसचे फास्टट्रॅक बंद आहे, अशी माहिती दिली असता ड्रायव्हरने वाहकाला सांगितले.
आपला प्रॉब्लम झाला, अशी माहिती या गाडीमध्ये पत्रकार रहेमत अली हे प्रवास करीत होते. त्यांनाही या फास्टट्रॅकचा त्रास सहन करावा लागला. दरम्यान त्यांना या विषयी माहिती मिळताच त्यांनी एस.टी.बसचे ड्रायव्हर व वाहक यांना विचारपूव केली असता त्यांना आश्चर्याचा धक्काच पोहचला. कारण तसेच होते की, एका टोल नाक्यावर येऊन एस.टी.बसच्या ड्रॉयव्हर व वाहकाला ही माहिती मिळाली. दरम्यान अनेक प्रवाशी खाली उतरले. बसचे ड्रायव्हरनीं आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली, तरी वरिष्ठांकडून टाळा-टाळ केले. पत्रकार रहेमत अली यांनी बुलढाणा आगारातील शुभांगी शिरसाट विभाग नियंत्रण अधिकारी यांच्याशी दूरध्वनीने संपर्क केला असता त्यांनी माहिती दिली की, पंढरपूर यात्रा सुरु असताना सर्व बसचे फास्टट्रॅक बंद करण्यात आले होते. आम्ही वरिष्ठांना फास्टट्रॅक बाबत सांगितले असता ताबडतोब सुरु करण्यात यावे, अशी माहिती दिली आहे.