* लोणार तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी ; तात्काळ पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी
लोणार : (एशिया मंच न्यूज )
तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने २५ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) प्रवक्ता लोकनेत्या जयश्रीताई शेळके यांनी २३ जुलै रोजी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शासनाने तात्काळ तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
केवळ सहा तासांत तालुक्यात सरासरी ११४.९ मिमी पावसाची नोंद झाल्याने लोणार शहर व ग्रामीण भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामावर पाणी फिरले असून शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक विवंचनेत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जयश्रीताई शेळके यांनी बुधवारी बाभुळखेड, गुंजखेड, जाफराबाद, हिरडव, गुंधा, पहूर या भागातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी मा.जि. प. सदस्य राजू मापारी, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, जिल्हा संघटक गोपाल बछिरे, युवासेना शहरप्रमुख ऋषिकेश जगताप, स्वप्निल हाडे, शाखाप्रमुख नितीन मुंढे, अंकुश मुंढे सरपंच, रवी मुंढे, करीम शाह, सदाशिव महाराज मुंढे, माजी सरपंच गणेश घायाळ, गोपी आखाडे , तालुकाप्रमुख राजू बुधवत, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आश्रू फुके, शिवसेना उपतालुकाप्रमुख श्रीकांत नागरे, युवासेना तालुका प्रमुख जीवन घायाळ, गजु कोळे, तालुका समन्वयक तेजराव घायाळ, गजानन जाधव, तानाजी मापारी, लुकमान कुरेशी ,गोपाल मापारी, शहर संघटक, स्वप्निलभाऊ हाडे, माजी सरपंच गणेश घायाळ, भारत चेके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.