बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
अनेक जणांना वाटत असतं लिहावं. आपलं लेखन प्रकाशित व्हावं, ते पुस्तकरूपात यावं. परंतु लिखाणाला नेमकी सुरुवात कशी करावी, हे मात्र माहित नसतं. तसच लिहिलेलं प्रकाशित कसं करावं, त्यासाठीची प्रक्रिया काय असते, याची माहिती नसते. ज्यांना हे जाणून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी सकाळ प्रकाशन आणि महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक वाचनालयातर्फे मोफत लेखन व पुस्तक प्रकाशन कार्यशाळेचे आयोजन २७ जुलै २०२५ रोजी, सायंकाळी ५.३० ते ८.३० पर्यंत दरम्यान होणार आहे. सदर कार्यक्रम महात्मा जोतीबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, मुठ्ठे लेआऊट, बुलडाणा येथे आयोजित केले आहे. इच्छुकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजनी केले आहे.
सकाळ प्रकाशनाच्या माध्यमातून नवोदित लेखक, प्रस्थापित लेखक आणि इतर लिखाणाशी संबधित तज्ञमंडळी यांचे लेखन पुस्तकरुपात प्रकाशित होत असते.
आजवर 'सकाळ'ने हजारहून अधिक पुस्तके प्रकाशित केली असून चाळीस लाखांहून अधिक पुस्तके जगभरात वितरित केली आहेत.
कार्यशाळेत पुस्तक निर्मितीची प्रक्रिया उलगडून दाखवण्यात येईल.
पुस्तकाचे लेखन, संपादन,
मांडणी, छपाई याबद्दल सविस्तर मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा ज्योतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वानरे राहतील. सकाळ प्रकाशनाच्या अमृता देसर्डा व लेखक सुमित डेंगळे या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील.
यावेळी सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या साहित्यिक काशीराम बोरे आणि म. जो. मुठाळ यांच्या पुस्तकांचे प्रकाशनही होणार आहे.जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखेडे यांच्यासह हरिभाऊ पल्हाडे, पत्रकार अरुण जैन यांची उपस्थिती राहणार आहेत. वाचनालयाचे हरिभाऊ कुडके, रवींद्र पाटील, इंजिनियर सुरेश चौधरी, गजानन घिरके, त्र्यंबक भराड, पांडुरंग बोदडे, हरिभाऊ पल्हाडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहतील.
ज्यांना लेखन आणि पुस्तक निर्मितीची प्रक्रिया जाणून घ्यायची आहे, ज्यांना स्वतःची पुस्तकं प्रकाशित करायची आहेत, अशा लेखकांनी, वाचकांनी कार्यशाळेला आवर्जून उपस्थित रहावे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि मोफत आहे.
अधिक माहितीसाठी ९४२२८८११०२, ९८५०३७६२०७, ९८८१५९८८१५ यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.