बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील युवकांचा मनसेत प्रवेश*युवकांकडे नेतृत्व देण्याची क्षमता मनसेत : अमोल रिंढे पाटील

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील युवकांचा मनसेत प्रवेश
*युवकांकडे नेतृत्व देण्याची क्षमता मनसेत : अमोल रिंढे पाटील
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        राजकारणात युवकांनी आले पाहिजे, असे आवाहन अनेक पक्षांकडून आणि संघटनांकडून सातत्याने केले जात आहे. पक्षप्रवेशासाठी पदाची प्रलोभने दाखविली जातात मात्र तरुणांनी प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे नेतृत्व देण्याची भूमिका इतर पक्षांकडून घेतल्या जात नाही. मात्र युवकांना राजकारणात आणून त्यांच्याकडे नेतृत्व देण्यात मनसे पक्ष अग्रेसर आहे, असे प्रतिपादन बुलढाणा मनसे तालुका अध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी केले.

         २२ जुलै रोजी बुलढाणा विधानसभा मतदार संघातील अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला. या युवकांचा सत्कार अमोल रिंढे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आगामी काळ हा मनसेचा असून पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या मेहनतीला फळ येणार आहे. राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होवून तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला, तो साथर्की ठरवेल, असेही अमोल रिंढे पाटील यांनी सांगितले. 

        छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत ऋषिकेश पाटील, प्रवीण गाडेकर, राजेश बोराडे, श्रीकृष्ण वाघ, अभिषेक कोरडे, कार्तिक कापसे, गणेश जाधव या बुलढाणा विधानसभेतील युवकांनी मनसेत प्रवेश केला. दरम्यान पक्षाची विचारधारा व ध्येय धोरणे घेऊन मनसे पक्ष वाढीसाठी व्यापक पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे नवप्रवेशित युवकांनी सांगितले. यावेळी आशिष गायके, साळवे, अनिकेत दाळिंमकर यांच्यासह शेकडो मनसैनिक उपस्थित होते.