लोणार : (एशिया मंच न्यूज )
"गण गण गणात बोते" च्या गजरात भक्तिभावाने नटलेल्या वातावरणात संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीने २५ जुलै २०२५ रोजी दुपारी एक वाजता मेहकर मतदारसंघात प्रवेश केला. या पावन क्षणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेतले आणि भक्तिभावाने तिचे स्वागत केले.
संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या विठूरायाच्या दर्शनानंतर परतीच्या मार्गावर असून, मेहकर मतदार संघात तिचे आगमन मोठ्या भक्तीभावात व जल्लोषात झाले. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या उपस्थितीत पालखीचे स्वागत फुलांच्या वर्षावात, वाद्यांच्या गजरात आणि पायी चालणाऱ्या हजारो भाविकांच्या जयघोषात भव्य स्वरूपात पार पडले.
या पावन प्रसंगी आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासोबत अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये काँग्रेस नेते लक्ष्मणदादा घुमरे, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, उबेदभाऊ खान, विठ्ठल चव्हाण, तालुका प्रमुख राजू बुधवत, महिला आघाडी तालुका अध्यक्ष तारामती जायभाये, युवा तालुका प्रमुख जीवन घायाळ , तेजराव घायाळ, मेहकर शहर प्रमुख किशोर गारोळे, साहेबराव हिवाळे, शांतीलालजी गुगलिया, साहेबराव पाटोळे, समदभाई, इकबाल कुरेशी, बादशहा खान, श्रीकांत जाधव, विठ्ठल जाधव, संजय तारु, प्रविण सरदार, श्रीकांत नागरे, परमेश्वर दहातोंडे, शेख लालमिया, समाधान ठाकरे, इकबाल कुरेशी,गजू मोरे, माजी नगरसेवक अरुण जावळे, गजानन खरात, गजानन जाधव, नितीन शिंदे, विकास माऊली आदींचा समावेश होता.
यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी गजानन महाराजांच्या चरणी साकडे घालत म्हणाले, “आमचा बळीराजा सुखी होवो, त्याच्या शेतमालाला भरघोस भाव मिळो. शेतकरी सुखी तर सर्व समाज सुखी! माऊली गजाननाची कृपा संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर राहो आणि जनता नेहमी समाधानी राहो.”
या भक्तिमय सोहळ्याने लोणार शहरात सुद्धा धार्मिक उर्जा आणि आध्यात्मिक आनंद निर्माण केला. गावातील नागरिक, महिला मंडळे, युवक मंडळे यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आणि संपूर्ण शहर “गण गण गणात बोते” च्या जयघोषाने दुमदुमले.