* अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
कुरेशी समाज पारंपरिक व कायदेशीररित्या पशू व्यापार, वाहतूक व कत्ल व्यवसाय पूर्वीपासूनच करीत आहे. मात्र अलीकडच्या काळात विविध ठिकाणी जातीय अत्याचार, बेकायदेशीर कारवाई, गोरक्षक यांचा व्यापाऱ्यांना नाहकचा त्रास या अधिक घटनांमध्ये वाढ झाली आहे, या प्रकाराला आळा घालण्यात यावा, यासाठी 24 जुलै रोजी मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे ठाणेदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना समस्त शेतकरी कुरेशी समाज बांधव यांनी जनावरांच्या खरेदी-विक्री बंदच्या अनुषंगाने विविध मागण्यांचे निवेदन दिले. कुरेशी समाजाच्या
व्यापाऱ्यांना नाहकचा त्रास बंद करण्यात येऊन शासनाने याकडे जातीने लक्ष देत आमच्या मागण्या सोडविण्यात यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने संपूर्ण कुरेशी समाज बांधवांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, कुरेशी समाज बांधव यांना जनावरांचे खरेदी-विक्री करीत असतांना त्यांना बाजार पेठेत तसेच रस्त्याने गाडीत जनावरे घेऊन जातांना गोरक्षकांच्या नाहकच्या त्रासाला कंटाळून आम्ही जनावरांचे खरेदी-विक्री बंद केली आहे. या निवेदनाच्या प्रति महामहीम राज्यपाल ,उपमुख्यमंत्री, पशुसंवर्धन विभाग मंत्री, कृषीमंत्री, अल्पसंख्यांक विभाग आयोग, जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले.
निवेदन देताना कलीम कुरेशी, अलीम कुरेशी, जमीर कुरेशी, युनुस कुरेशी, पत्रकार इसाक पटेल, शब्बीर कुरेशी, मुनाफ कुरेशी, लाला कुरेशी, हरून कुरेशी, सुल्तान कुरेशी, बुडन कुरेशी, जबीर कुरेशी, सईद कुरेशी, रईस कुरेशी, रहेमान कुरेशी, कदीर कुरेशी, कलीम बापू कुरेशी, खालीक कुरेशी, आजम कुरेशी, सद्दाम कुरेशी, मुजीब कुरेशी, मोहम्मद कुरेशी, इक्बाल कुरेशी यांच्यासह गावातील कुरेशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.