* विधवा महिलांनी सहभागी होण्याचे प्राध्यापक डी.एस. लहाने यांचे आवाहन
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
जागतिक विधवा महिला दिनाचे औचित साधून मानस फाउंडेशनच्या वतीने बुलढाण्यात विधवा महिलांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत विधवा महिलांच्या विविध समस्या, त्यावर उपाय ,रोजगार,पाल्याचे शीक्षण यावर चिंतन केले जाणार आहे.
शिवसाई ज्ञानपीठ बुलढाणा या ठिकाणी 22 जून रोजी सदर कार्यशाळा 11 ते 2 या वेळेत शिवसाई ज्ञानपीठ समता नगर बुलढाणा येथे आयोजित केली आहे. विधवा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे व स्वावलंबी जीवनासाठी मानस फाउंडेशनच्या माध्यमातून प्राध्यापक डी.एस. लहाने यांचे प्रयत्न सुरू आहे. जागतिक विधवा महिला दिन 23 जून रोजी जगभर साजरा केला जात आहे. या दिवशी विधवा महिलांच्या समस्यावर प्रकर्षाने चर्चा घडवून आणली जाते. बुलढाण्यात मानस फाउंडेशन च्या वतीने शिवसाई ज्ञानपीठ या ठिकाणी कार्यशाळा होत आहे. या कार्यशाळेमध्ये मानस फाउंडेशनचे कार्यकर्ते, विविध विषयावर चिंतन मनन करणार आहे. कार्यशाळेत बहुतांश विधवा महिलांनी सहभागी होण्याच आवाहन प्राध्यापक डी.एस. लहाने यांनी केले आहे.
* नाशिक येथे राष्ट्रीय विधवा महिला परिषद :
नाशिक येथे आयोजित या संमेलनामध्ये देशभरातून निवडक 60 व्यक्तींना निमंत्रित केले जाणार आहे. विविध राज्याचे प्रतिनिधी या विधवा परिषदेला जात आहे. त्यामध्ये बुलढाण्यातून प्राध्यापक डी.एस. लहाने यांना निमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावर विधवा महिलांच्या समस्यांवर या परिषदेत चर्चा करणार आहे. याशिवाय या महिलांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सनद भारत सरकारला सादर केली जाणार आहे. शिवाय न्यायालयात जनहित याचिका देखील केली जात आहे. त्यामध्ये माणूस फाउंडेशनच्या माध्यमातून कार्य करणारे प्रा. डी.एस. लहाने आपले विचार मांडणार आहेत.