*अवैध धंदेविरोधात शहर पोलिसांची धडक मोहीम
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
शहरातील काही भागात हातगाडी, टपऱ्यांवर अंडाविक्रीसोबत अवैध दारूविक्री होत असल्याने शहर पालिसांनी अतिक्रमण धारकांवर कारवाई केली. अंडाविक्रीच्या तीन गाड्या जमा करुन दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
16 जून रोजी हातभट्टी व अवैध्द दारुविक्री संबंधाने विशेष मोहिम राबविण्यात आली. अवैध दारु व हात भट्टी विक्री करणाऱ्या आठ जणांवर कारवाई करून 32,775 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच शहरातील महत्वाचे रस्ते तसेच चौकातील हात गाडी टपऱ्यांवर चालणाऱ्या अवैध दारु विक्रीविरोधात कारवाई करण्यात आली. जांभरुन रोड, बस स्टैंडच्या बाजुला व जिल्हा परिषद समोरील अंडाविक्री करणाऱ्या पाच जणांवर कारवाई करण्यात आली. याठिकाणी अवैध दारूविक्री सुरु असल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. यामध्ये 1,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तीन अंडा विक्री करणाऱ्या गाड्या पोस्टेला आणुन जप्त करण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, पानटपरी, अंडाविक्री, मोकळे मैदान, शासकिय जागेवर किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दारुचे सेवन तसेच अवैधरित्या दारुची विक्री केल्यास त्यांच्यावर पोलीस व नगर पालिका प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रवी राठोड यांनी ही कारवाई केली.