अकरावर्षीय मुलाचा अल्पवयीन बालिकेवर अतिप्रसंग
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
अकरावर्षीय मुलाने एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याची घटना रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली. याप्ररकणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी बालक हा वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एका गावाचा मूळ रहिवासी आहे. काही काळापासून पीडित मुलगी आणि आरोपी बालक हा सध्या रायपूर पोलीस ठाणे हद्दीत राहत होता. दरम्यान 17 जून रोजी आरोपी बालकाने सात वर्षीय बालिकेवर लैंगीक अत्याचार केला. यापूर्वीही असा प्रकार त्याने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. देशात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली असून अल्पवयीन मुली सुद्धा सुरक्षित नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे.