शेतकऱ्यांच्या हक्कासाठी खास बैठक : महावितरण अधिकाऱ्यांसोबत थेट संवाद

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी खास बैठक  : महावितरण अधिकाऱ्यांसोबत थेट संवाद
मेहकर :  (एशिया मंच न्युज)
         मेहकर-लोणार मतदार संघातील शेतकरी व नागरिकांच्या वीजविषयक तक्रारी सोडवण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सोमवार,  २३ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता हॉटेल के. व्ही. प्राईड हॉल, मेहकर येथे पार पडणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात हे राहणार आहेत.

          या बैठकीसाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार असून, शेतकरी व नागरिकांना वीजविषयक समस्या थेट मांडता येणार आहेत. शेतकरी बांधवांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी आपल्या सर्व तक्रारी दोन प्रतींमध्ये लिहून आणाव्यात. पूर्वी महावितरणकडे दिलेल्या पण अजूनही निकाली न लागलेल्या तक्रारींसोबत पाठपुरावा व अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई अथवा दुर्लक्ष याचे पुरावे देखील सोबत आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
       या बैठकीतून अनेक प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघण्याची शक्यता असून, शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला हक्क मांडावा असे आवाहन करण्यात आले आहे.