मेहकर : (एशिया मंच न्युज)
जगभर साजरा होणारा इंटरनॅशनल योगा डे अर्थात जागतिक योग दिवस येथील संत निरंकारी भवनात आज 21 जून रोजी उत्साहात पार पडला.
सकाळी कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना तसेच ध्यानाने करण्यात आली. त्यानंतर योगशिक्षक प्रल्हादजी जाधव यांचे स्वागत प्रमोद देशमुख यांनी केले. प्रास्ताविकात ब्रांच मुखी सत्यनारायणजी सौभागे यांनी योगाचे महत्त्व समजावून सांगितले. शरीर व मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग अत्यावश्यक आहे, असा संदेश देत योगशिक्षक प्रल्हादजी जाधव यांनी ताडासन, भुजंगासन, वृक्षासन, त्रिकोणासन, पवनमुक्तासन यांसारखे आसन तसेच अनुलोम विलोम, भ्रामरी,कपालभाती इत्यादी प्राणायाम सर्वांकरवी एकसाथ करुन घेतले. योगदिनाच्या यशस्वी आयोजनासाठी सेवादल संचालक प्रकाश अवताडे, शिक्षक संजय माने व महिला सेवादल यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. योगा फॉर वेलनेस या घोषवाक्याला साजेसा असा हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाला.