केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलढाणा लोकसभा मतदार संघात योग दिन कार्यक्रम उत्साहात साजरा ...! * गावापासून ते जिल्हास्तरीय योगदिन कार्यक्रमात बालक , युवक ,युवती , महिला -पुरुष आणि वयोवृद्धांनीही नोंदविला सहभाग

केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलढाणा लोकसभा मतदार संघात योग दिन कार्यक्रम उत्साहात साजरा ! 
* गावापासून ते जिल्हास्तरीय योगदिन कार्यक्रमात बालक , युवक ,युवती , महिला -पुरुष आणि वयोवृद्धांनीही नोंदविला सहभाग
 
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
         अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील गाव गावात , शहरी भागात आणि जिल्हास्तरावर आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच सहभाग नोंदवित योग साधना करून आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा केला.
 
          एक पृथ्वी आरोग्यासाठी योग हे या वर्षीच घोषवाक्य एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग या संकल्पनेवर आधारित यंदाचा योग दिन कल्याणकारी एकात्मिक दृष्टिकोन देणारा ठरणार आहे. सर्वे सन्तु निरामयः  (सर्व रोगमुक्त होऊ देत) या भारतीय नीति तत्त्वातून मानव आणि ग्रहांच्या आरोग्याच्या परस्परसंबंधावर यामध्ये भर दिला आहे.
      यावर्षीचा अकरावा आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्य केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात गाव पातळीपासून शहर आणि जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. तालुकास्तरावर तालुका क्रीडा मैदान , शाळा , ग्रामपंचायत अशा विविध स्तरांवर अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम येथे जिल्हास्तरीय योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.  किरण पाटील यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच संगीतमय योगा क्षितिज निकम यांनी सादर केला. त्यानंतर योग्य शिक्षिका अंजली परांजपे योगशिक्षक प्रशांत लहासे, आर्ट ऑफ लिव्हिगचे योग प्रशिक्षक सचिन ठाकरे,  प्रजापिता विश्व ब्रह्मकुमारी संस्थांच्या दिदी यांनी योगासने प्राणायामय ध्यान या योग प्रात्यक्षिकांचे महत्व विषद करत योगासने करून घेतली. प्रत्येकांनी आपल्या जीवनामध्ये दररोज योग साधना करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 
        जिल्ह्यात तालुकास्तरावर क्रीडा मैदान आणि ग्रामीण भागामध्ये ही गाव पातळीवर ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळांमध्ये योगदिन साजरा करण्यात आला . गावपातळीपासून तर जिल्हा पातळीपर्यंत या योग दिन कार्यक्रमांमध्ये लहानांपासून तर वयोवृद्धांपर्यंत विद्यार्थी, युवक, युवती, महिला, पुरुष आणि वयोवृद्धांनी योग साधनेत सहभाग नोंदवून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला.