कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबद्दलची गरळ भाजपचा खरा चेहरा दाखवणारी !* शिवसेना (उबाठा) प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी घेतला भाजप मंत्र्याच्या वक्तव्याचा समाचार..

कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबद्दलची गरळ भाजपचा खरा चेहरा दाखवणारी !
* शिवसेना (उबाठा) प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी घेतला भाजप मंत्र्याच्या वक्तव्याचा समाचार..
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
      कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबद्दलची गरळ भाजपचा खरा चेहरा दाखवणारी आहे, असे खडे बोल शिवसेना (उबाठा) प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी सुनावले आहेत. 

        "कर्नल सोफिया कुरैशी या दहशतवाद्यांची बहीण आहे" असं विधान मध्यप्रदेशच्या विजय शाह या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याने केले. या वक्तव्याचा जयश्रीताई शेळके यांनी सोशल मीडियावर खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या, हा अपमान एका वीर महिलेचा नाही, तर संपूर्ण भारतीय सेनेचा आणि देशाच्या सन्मानाचा अवमान आहे. कर्नल सोफिया कुरैशी या पहिल्या भारतीय महिला अधिकारी आहेत ज्यांनी युनायटेड नेशन्सच्या मिशनमध्ये सैन्य दलाचं नेतृत्व केलं आहे. त्यांच्या कर्तृत्वावर संपूर्ण देशाला अभिमान आहे. अशा एका राष्ट्रसेविकेबद्दल खोटं आणि अपमानजनक विधान करणं म्हणजे देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या प्रत्येक जवानांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करणं आहे. भाजपच्या राजकीय संस्कृतीचे हे लक्षण आहे. साध्वी प्रज्ञासिंगसारख्या दहशतवादी व्यक्तीला संसदेत नेणाऱ्या भाजपने कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबद्दल ही गरळ भाजपचा खरा चेहरा दाखवणारी आहे.