भाजपचे मंत्री विजय शहा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
* चिखली काँग्रेसचे तहसिलदारामार्फत राष्ट्रपतींना निवेदन
चिखली : (एशिया मंच न्युज)
पाकिस्तानवर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकसंदर्भात पत्रकार परिषदांमधून देशाला अवगत करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना मध्यप्रदेशचे भाजपामंत्री विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरोधात बेताल विधान केले आहे. याप्रकरणी चिखली काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरुपात निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपचे मंत्री विजय शहा यांनी माफी मागून राजीनामा द्यावा. तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शुक्रवार १६ मे रोजी चिखली काँग्रेसच्या वतीने तहसिलदारामार्फत राष्ट्रपतींना निवेदनातून करण्यात आली.
निवेदनात नमूद आहे की, देशाचे जवान हे आपल्याला सुरक्षीत ठेवण्याकरीता आपल्या जिवाची पर्वा न करता सतत सिमेवर कार्यरत असतात. जात- पात न मानता आपल्या देशाच्या शत्रूशी दोन हात करतात. आपले कुटुंब सोडून देशाच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस सिमेवर पहारा देत असतात. परंतू दुसरीकडे भाजपाचे मंत्री, आमदार मात्र जातीय द्वेष वाढवण्याकरीता खालच्या पातळीचे विधान करतात हे संपुर्ण देशवासियांसाठी निंदणीय आहे. अशा मंत्री व आमदारांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांचे पद रद्द करण्यात यावे. अन्यथा चिखली काँग्रेसच्या वतीने यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, अशा इशाराही तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आला आहे.
चिखली कॉग्रेसच्या वतीने तहसिलदार चिखली यांच्या मार्फत राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या निवेदन प्रसंगी शहर कॉग्रेसचे अध्यक्ष अतहरोद्यनी काझी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रे, डॉ. मोहमंद इसरार, प्रा. निलेश गांवडे सर, प्रा.राजु गवई सर, युवक कॉग्रेसचे रिक्की काकडे, राजु रज्जाक, डॉ. अमोल लहाने, खलील बागवान, व्यंकटेश रिंढे, सोहिल अशिफ शेख, अयान जमदार, रामभाऊ भुसारी, भास्कर चांदोरे, सरफराज पटेल, शेख शकील अहेमद, शेख मोसेफ, असलामन खान, शेख साकीफ, अरशान बेग, शेख उजेब यांच्यासह असंख्य कायकर्ते उपस्थतीत होते.