राजेंच्या कन्येच्या विवाहाला सीएम फडणविसांची हजेरी* वधू डॉ. शिवानी आणि वर डॉ. नीलेश यांना दिले आशिर्वाद

राजेंच्या कन्येच्या विवाहाला सीएम फडणविसांची हजेरी
* वधू डॉ. शिवानी आणि वर डॉ. नीलेश यांना दिले आशिर्वाद
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
       भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या कन्येच्या विवाहाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टरने हजेरी लावली. वधू चि. सौ. कां. डॉ. शिवानी आणि वर चि.डॉ.नीलेश यांना आशीर्वाद दिले. भाजपसह अन्य पक्षातील मान्यवरांशी त्यांनी संवाद साधला. राजेंच्या कन्येच्या विवाहातील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली.

       माजी आमदार विजयराज शिंदे यांची कन्या चि. सौ. का. डॉ. शिवानी हिचा विवाह नाशिक येथील खंडेराव तुकाराम पाटील यांचे चिरंजीव डॉ. निलेश यांच्यासोबत आज पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या विवाह सोहळ्याला लाभली. बुलढाणा रेसिडेन्सीच्या लॉन्सवर दुपारी १ वाजेच्या सुमारास वैदीक पद्धतीने हा विवाह पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र अर्थात यांनी वधू-वरांना आशिर्वाद दिला. दोघांची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत आणि दोघांच्याही आयुष्यात सुखसमृद्धी नांदो, अशा सदिच्छा व्यक्त करतांना देवाभाऊंनी विजयराज शिंदे यांच्यावर त्यांचे असलेले प्रेमही व्यक्त केले.