मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बुलढाणा दौरा * भाजप कार्यालयाचे भूमिपूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बुलढाणा दौरा 
*  भाजप कार्यालयाचे भूमिपूजन 
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
      भारतीय जनता पार्टीच्या बुलडाणा जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन १६ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. हा भूमिपूजन सोहळा बुलडाणा रेसिडेन्सी च्या मागे सकाळी ११ वाजता होणार असून या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, कामगार मंत्री आकाश फुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, केंद्रीय मंत्री नामदार रक्षाताई खडसे, आमदार श्वेताताई महाले, आमदार संजय कुटे, माजी खासदार सुखदेव नंदाजी काळे, माजी आमदार तोताराम कायंदे , जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहे. 
       भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन विजयराज शिंदे व  सचिन देशमुख यांनी केले आहे.