भाजपमध्ये विजय'राज'..! * माजी आमदार विजयराज शिंदेच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ

भाजपमध्ये विजय'राज'..! 
* माजी आमदार विजयराज शिंदेच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
       तीन वेळा बुलढाण्याचे आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली असून त्यांची घाटावरील जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. नगरपालिका, जिल्हापरिषद निवडणुकांच्या तोंडावर विजयराज शिंदे यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडल्याने भाजपमध्ये विजय'राज' आल्याचे बोलले जात आहे.

         मूळचे शिवसैनिक असलेले विजयराज शिंदे सद्या भाजपाचे लोकसभा निवडणूक संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. शिवसेना एकत्र असतांना त्यांनी 1995, 2004, 2009 असे तीनदा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2019 ला त्यांनी वंचीत बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. कायम चर्चेत राहणारे नेते आणि सतत प्रयत्नरत राहणारे राजकारणी म्हणून विजराज शिंदे ओळखले जातात. भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाने वातावरण निर्माण झाले आहे. संगम चौकात फटाके फोडून त्यांनी नियुक्तीचा जल्लोष साजरा केला.