सहकार विद्या मंदिरमध्ये 'ऑपरेशन सिंदुर' नावाने शालेय इमारतीचे नामकरण

सहकार विद्या मंदिरमध्ये 'ऑपरेशन सिंदुर' नावाने शालेय इमारतीचे नामकरण
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
         ऑपरेशन सिंदुर या भारतीय सैन्य दलाने राबविलेल्या पाकिस्तानातील दशतवादी अड्डयावर जिगरबाज कारवाई करीत मिशन फत्ते केले. या लढतीचे कायम स्मरणात रहावे, म्हणून बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिर येथील सीबीएसई इमारतीचे आज १० मे रोजी ऑपरेशन सिंदुर हे नांव देण्यात आल्याने या अनोखी कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

        गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी जम्मु कश्मिर मधील पहलगाम येथील पर्यटन स्थळ बैसरण घाटीमध्ये पाकिस्तानी आंतकवाद्यांनी २६ निर्दोष भारतीय पर्यटकांची हत्या केली. भारताच्या तिन्ही दलाने सामजस्यं व अप्रतिम कारवाई करीत ७ मे २०२५ रोजी मध्यरात्री पाकव्याप्त कश्मिरातील व पाकिस्तान मधील दहशतवाद्याचे अड्डे उध्दव्स्त करीत शेकडो अतिरेक्यांना यमसदनी पाठविले व पहलगाम हल्याचा बदला घेतला. या संपुर्ण मिलिटरी कारवाईला 'ऑपरेशन सिंदुर' नांव देण्यात आले.

        बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांनी भारतीय सैन्य दलाचे हे कार्य नेहमी स्मरणात रहावे, यासाठी काही तरी वेगळे करावे, म्हणून त्यांनी अध्यक्षा सौ. कोमल झंवर यांच्याशी चर्चा करीत सदर नाव सी.बी.एस.ई. इमारतीला ऑपरेशन सिंदुर हे देण्याचे निश्चित केले. आज १० मे २०२५ रोजी सदर इमारतीचे नामकरण 'सिंदुर' करण्यात आले व भारतीय सैन्यदलाला ही अनोखी मानवंदना देण्यात आली.