* पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर साधला प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
आगामी अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आज १ ऑगस्ट रोजी मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. शिक्षक मतदार संघावर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, असा निर्धार यावेळी करण्यात आला.
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे. राजकीय पक्षांनी यादृष्टीने तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात १ ऑगस्ट रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला जिल्ह्यातील खासदार, आमदार, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्याशी संवाद साधला. यावेळेस अमरावती विभाग शिक्षक मतदार संघावर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, असा निश्चय सुद्धा केला.