अनिल नरोटे यांनी बांधले शिवबंधन * मातोश्री येथे घेतली पक्षप्रमुखांची भेट

अनिल नरोटे यांनी बांधले शिवबंधन 
* मातोश्री येथे घेतली पक्षप्रमुखांची भेट 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
           शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश घेतलेले बुलढाणा येथील उद्योजक अनिल नरोटे यांनी आज मुंबई मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी शिवसेना नेते सचिव माजी खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधले.

           यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत , शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नरोटे कुटुंबीय शेतीमातीचे प्रश्न लावून धरणारे, आणि सामाजिक उत्तरदायित्व निभावत काम करणारे आहे. कोरोना काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेली कामगिरी, शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत दिलेली कर्जमाफी कुटुंबप्रमुख म्हणून सांभाळलेला महाराष्ट्र तसेच सर्वसमावेशक भूमिका लक्षात घेऊन नरोटे यांनी बुलढाणा येथे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यात प्रवेश घेतला होता. 
        आज १ ऑगस्ट रोजी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी कृष्णा बुधवत, गोविंद दळवी यांचीही उपस्थिती होती. अनिल नरोटे यांच्यावर बुलढाणा विधानसभा मतदार संघाच्या सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.