पीएम सन्मान निधीचा 20 वा हप्ता : 2 ऑगष्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार वितरित ! * बुलढाणा येथे होणाऱ्या स्थानिक कार्यक्रमात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव होणार सहभागी

पीएम सन्मान निधीचा 20 वा हप्ता :  2 ऑगष्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार वितरित ! 
* बुलढाणा येथे होणाऱ्या स्थानिक कार्यक्रमात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव होणार सहभागी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्या 2 ऑगस्टला हस्तांतरित होणार आहे. त्यानिमित्य बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्र येथे होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित राहणार आहेत.
      Bbपीक लागवडीच्या काळात शेतकऱ्यांना मदत व्हावी, या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्यावतीने पीएम किसान सन्मान योजना केंद्र सरकारच्यावतीने कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना दोन हजाराचे तीन टप्पे असे एकूण 6000 रुपये देण्यात येतात. पीएम किसान योजनेचा 20 वा टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 2 ऑगस्टला वितरित केल्या जाणार आहे.  त्यानिमित्य एका कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते वितरित होणाऱ्या शेतकरी सन्मान निधी वाटप कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्रात केल्या जाणार आहे. त्याच प्रमाणे कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना सुधारित सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, हुमणी कीड ओळख व एकात्मिक व्यवस्थापन आणि सघन आंबा लागवड तंत्रज्ञान इत्यादी विषयावर मार्गदर्शन सुद्धा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील, आमदार संजय गायकवाड, आमदार धीरज लिंगाडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जास्ती जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. अमोल झापे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, प्रकल्प संचालक आत्मा पुरुषोत्तम उन्हाळे यांनी केले आहे.