* चिखली येथे जिल्हास्तरीय बैठक संपन्न ; सकल मातंग समाजाची वज्रमूठ
चिखली : (एशिया मंच न्युज)
सकल मातंग समाजाची 20 मे 2025 रोजी आझाद मैदानावर निघणाऱ्या जनआक्रोश मोर्चाच्या नियोजनाच्या बैठकीसाठी सकल मातंग समाज बुलढाणा जिल्ह्याची महत्त्वाची आयोजित बैठक श्रीराम सहकारी नागरी पतसंस्था सभागृहात 29 एप्रिल रोजी पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना नेते विजय अंभोरे हे होते.
या बैठकीला मार्गदर्शन करताना ते म्हणाले की,अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी 20 मे 2025 रोजी सकल मातंग समाजाच्या बॅनरखाली आझाद मैदानावर " एकच लक्ष आझाद मैदानावर पाच लक्ष " या घोषणेने लाखो बांधव उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात अशा प्रकारच्या बैठका आयोजित करून समाज संघटीत करून आरक्षण उपवर्गीकरणाचे महत्त्व सांगून जनआक्रोश मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान त्यांनी केले. सर्वच जिल्ह्यामध्ये आमदार, माजी खासदार, माजी आमदार , सर्वच काम करीत असल्याचे प्रतिपादन विजय अंभोरे यांनी केले.
या ठिकाणी पुढे बोलताना ते म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यातील मातंग वस्त्यात जाऊन तेथे समाजातील नेते कार्यकर्ते संघटनेचे प्रमुख यांना एकत्र करून तालुक्यातील गावनिहाय समाजाची संख्या पाहून जनाक्रोश मोर्चाचे वातावरण निर्मिती करून इच्छुक समाज बांधवांच्या याद्या तयार करून त्यांना आझाद मैदानाकडे घेऊन येण्यासाठीच्या सुविधा सर्व सकल मातंग समाजातील नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यावतीने करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक प्रा. पंडित सूर्यवंशी लातूर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी आरक्षणाचे महत्व येणाऱ्या भावी पिढीसाठी एक जबाबदारी म्हणून आपण एकत्र येऊन या पवित्र कार्याला हातभार लावावा आणि हे जनआक्रोश मोर्चा यशस्वी करावा, अशा प्रकारचे आव्हान त्यांनी केले. ते बोलताना पुढे म्हणाले की, आरक्षण उपवर्गीकरण हे मातंग समाज आणि वंचित जातीसाठी वरदान ठरणारे असून यासाठी आपण सर्वांनी ताकदीने आणि उमेदीने लढा दिला पाहिजे असेही भावनिक आवाहन त्यांनी केले .
उपवर्गीकरणाची चळवळ मातंग समाजासह अनेक वंचित जातींना त्यांचे परिवर्तन करणारी असून या परिवर्तनाच्या लढाईत आपण सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी विनोद जोगदंड , श्रीकृष्ण शिंदे, सोपान पानपाटील , गजानन पवार , सौ.सिंधुताई तायडे अनिल कांबळे यांची समयोचित भाषणे झाली. आरक्षण उपवर्गीकरण ही वंचित आणि मातंग समाजासह समाजाला संजीवनी ठरणारी आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डिंगाबर पाटोळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर धोगड़े यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश पवार यांनी केले. या बैठकीसाठी जिल्हयातिल मतंग समाज शेकडो कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीच्या यशवीतेसाठी बी. के. खरात, एस. एल. डोंगरे, छोटू कांबळे, निवृत्ती तांबे, ओमप्रकाश नाटेकर, कुंदन यंगड, शेषराव साळवे, प्रदीप साळवे, रामदास कांबळे, सचिन कांबळे ,विजय निकाळजे, किरण बोरकर, तुकाराम उबाळे , रितेश यंगड आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.