चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर
चिखली : (एशिया मंच न्युज)
         महाराष्ट्र पोलीस दलात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरी करिता पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे पदक प्रदान करण्यात येते.
       चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी 15 वर्षांहून अधिक काळ पुणे ग्रामीण, बुलढाणा, अकोला, मुंबई या ठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावून केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.
   1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनी बुलढाणा जिल्हा मुख्यालयी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते ठाणेदार संग्राम पाटील यांना पोलीस महासंचालक पदक पदक प्रदान करण्यात येणार आहे.
   पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यात ठाणेदार म्हणून धाड, धामणगाव बढे, साखरखेर्डा, चिखली या ठिकाणी स्थानिक समुदायाशी उत्तम समन्वय साधला असून त्यांच्या या गौरवासाठी सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.