सुजित देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रवक्ता*ना. अजितदादा पवार यांच्या सूचनेवरून मोठी जबाबदारी!

सुजित देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रवक्ता
*ना. अजितदादा पवार यांच्या सूचनेवरून मोठी जबाबदारी!
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीवर जिल्हा पक्ष प्रवक्ता म्हणून येथील सुजित देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजित देशमुख हे ,स्पष्ट वक्ते आहेत. त्यांच्या सह शहर व इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहे. जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट नाझेर काझी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आज नियुक्तीपत्र दिले.
          पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी जिल्हा पक्ष प्रवक्त हे महत्त्वाचे पद मानले जाते. सुजित देशमुख यांनी यापूर्वी या पदावर काम केले आहे. राजकीय विषयांचा सखोल अभ्यास आणि मुद्देसुद् मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य. बुलडाणा जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रवक्ता या महत्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार,  पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल, प्रांताध्यक्ष खा. सुनिल तटकरे, जिल्ह्यांचे पालकमंत्री ना. मकरंद आबा पाटील यांचे सूचनेवरून पक्ष नेतृत्वाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविने, पक्ष संघटनेला अधिक बळकटी देणे, यास मोठी मदत होणार आहे. त्याअनुषंगाने आपण प्रयत्नांची शिकस्त कराल, अशी अपेक्षा देखील नियुक्ती पात्रात करण्यात आली आहे. याचबरोबर मंगेश बिडवे जिल्हा सरचिटणीस, अनिल बावस्कर बुलढाणा शहर अध्यक्ष, शेख सत्तार शेख महबूब कुरेशी शहर कार्याध्यक्ष यांच्यावरही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.