आग्रा येथील लेक्रॉस राष्ट्रीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील पोलीस बॉईज खेळाडू रवाना

आग्रा येथील लेक्रॉस राष्ट्रीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील पोलीस बॉईज खेळाडू  रवाना
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
        आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक मान्यताप्राप्त असलेला लेक्रॉस खेळ हा सन 2028 च्या ऑलिंपिक खेळामध्ये समाविष्ट असलेला खेळ असून लेक्रॉस फेडरेशन ऑफ इंडिया यांचे मान्यतेखाली उत्तर प्रदेश लेक्रॉस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरी लेक्रॉस राष्ट्रीय ज्युनिअर अँड सिनियर स्पर्धा  29 एप्रिल ते 01 मे 2025 ला जॉन मिल्टन पब्लिक स्कूल, आग्रा येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडूंनी पुणे येथे झालेल्या दिनांक 14 ,15 एप्रिल 2025 रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये लेक्रॉस खेळाचे उत्कृष्ट पप्रदर्शन करून महाराष्ट्र राज्य संघात सिनियर गटामध्ये बुलढाणा जिल्ह्याचे खेळाडू सागर बोर्डे, राहुल चांदणे, अनिस शेख, सिद्धेश्वर सोळंकी, पार्थ जोक तसेच सोहील रेघिवाले, ज्युनिअर गटामध्ये शिवराज निळे, आर्यन गिरी, अर्शद शेख, कैफ शेख, आशिष आंधळे, समीर चौधरी, केयुर पवार यांचे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्रीराम निळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.          महाराष्ट्र लेक्रॉस असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमती डॉक्टर सुमेधा ठाका ,सचिव डॉक्टर मोहद बाबर, लेक्रॉस असोसिएशन ऑफ बुलढाणा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सौ. ज्योती निळे, सचिव  दिपक माठे, निलेश इंगळे, प्रकाश करंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त  शेषनारायण लोढे, राखीव पोलीस निरीक्षक तिडके पोलीस मुख्यालय बुलढाणा, ASI नसीम मिर्झा, पोलीस हवालदार शरद गिरी ,नंदू आंधळे , डीआय मुतलीफ शेख, शेख यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.