चाकुचा धाक दाखवुन जबरदस्ती खिशातील पैसे काढणारा चोरटा अटक* चिखली पोलिसांची कामगिरी

चाकुचा धाक दाखवुन जबरदस्ती खिशातील पैसे काढणारा चोरटा अटक
* चिखली पोलिसांची कामगिरी
चिखली : (एशिया मंच न्युज)
      चाकुचा धाक दाखवुन जबरदस्ती खिशातील पैसे काढणारा आरोपी पोलीस स्टेशन चिखली यांनी केला अटक केली आहे. 27 एप्रिल रोजी शेख सलिम शेख हनिफ याने चिखली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांचे जुने फर्निचर विक्रीचा व्यवसाय खामगाव चौफुली बुलडाणा रोडच्या बाजुला चिखली येथे दुकान लावतात व रात्रीच्या वेळेस तेथेच झोपतात. 24 एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे आपल्या धंदयाचे काम आटोपुन रात्री 10 वाजताचे सुमारास ते व त्यांचे शेजारी पंडीत गोलांडे हे रात्रीच्या वेळी झोपलेले होते. फिर्यादी यांचेकडे फर्निचर विक्रीचे 11 हजार रुपये त्यांचे पॅन्टचे खिशात ठेवले होते. 25 एप्रिलच्या रात्री 12.30 वाजताच्या सुमारास फीर्यादी हे झोपलेले असतांना कोणीतरी त्यांचे खिशामध्ये पॅन्टचे हात घातल्याचे जाणवले तेव्हा त्यांनी झोपेतून उठुन पाहीले असता एक काळया रंगाची टी-शर्ट घातलेला एक इसम याने फीर्यादीचे पॅन्टचे खिशामध्ये हात घालुन 11 हजार रुपये जबरदस्तीने काढुन घेतले. फीर्यादीने प्रतिकार केला असता, हाताला झटका मारुन त्या इसमाने त्याचे खिशातील चाकु काढुन फीर्यादीचे पोटाजवळ लावला व आता जर आवाज केला तर तुला इथेच भोसकुन टाकतो. अशी धमकी देवुन त्याने रोडवर लावलेली काळया रंगाची मोटारसायकल घेवुन निघुन गेला. यावरून चिखली पोलिस स्टेशनमध्ये 27 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        चिखली पोलिस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी स्वतंत्र पथक नेमले. त्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून विवेक ऊर्फ मुठल्या ब्राम्हणे हा असल्याचे समजल्याने सदर आरोपीचा शोध पथकातील अंमलदार तात्काळ रवाना झाले. असता सदरचा आरोपी हा आदर्श कॉन्व्हेंट रोहीदास नगर चिखली येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनला आणून गुन्हयासंबंधाने माहीती देवुन आरोपी यांस विचारपुस केली असता त्याने उडवाउडविची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास विश्वासात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. सदर गुन्हयातील चोरलेले 11 हजार रुपये पैकी 8 हजार 560 रुपये आरोपी कडुन हस्तगत करण्यात आले.

      सदरची कार्यवाही ठाणेदार संग्राम पाटील, डि.बी.पथकाचे पोउपनि समाधान वडणे, सफौ राजेंद्र काळे, पोना अमोल गवई, पोकॉ अजय इटावा, प्रशांत धंदर, पंढरीनाथ मिसाळ, पोकॉ राजेश मापारी, सागर कोल्हे, निलेश सावळे, राहुल पायघन, मपोहेकॉ माया सोनोने, मपोकों रुपाली उगले पोलीस स्टेशन चिखली यांनी केली आहे.