शिवसेना उबठा पक्षाच्या वतीने महायुतीच्या प्रतापरावांनी केलेल्या प्रतापाची अंतयात्रा काढून जाहीर निषेध

शिवसेना उबठा पक्षाच्या वतीने महायुतीच्या प्रतापरावांनी केलेल्या प्रतापाची अंतयात्रा काढून जाहीर निषेध

मलकापूर : (एशिया मंच न्युज)
         एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्या भाडे वाढीला मंजूरी देण्यात आली आहे. येत्या २५ जानेवारी पासून ही दरवाढ लागू झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. अशात ही भाडेवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे हा भाडेवाढ रद्द करण्यात यावी, यासाठी शिवसेना उबाठाच्या वतीने परिवहन मंत्र्याची प्रतिकात्मक अंत्यात्रा काढून आंदोलन केले. मलकापूर येथील एसटी स्थानकांसमोर प्रतापरावांच्या प्रतिकात्मक पार्थिवाला अग्निडाग देण्यात आला. मलकापूर तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील, तथा शहर प्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वाखाली अंतयात्रा काढून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. एसटीची वाढलेली भाडेवाढ रद्द करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी एसटी महामंडळाच्या निर्णयासह राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे नाव न घेता त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
          “एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली १५ टक्के भाडेवाढ ही अन्यायकारक आहे. दोन महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी एसटी नफ्यात असल्याची घोषणा केली होती. याबाबत आकडेवारीही जाहीर केली होती. पण आता एसटीकडून तिकिटांमध्ये १५ टक्के भाडेवाढ करण्यात आली. दुर्दैव म्हणजे एसटी ही भाडेवाढ परिवहन मंत्र्यांनाच माहीत नाही. “एसटीची भाडेवाढ हा अन्याय आहे. कारण शहरी भागात आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या प्रवासाचे एसटी हे मुख्य साधन आहे. पण हेच सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन महागलं असेल तर, ही भाडेवाढ रद्द झाली पाहिजे. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका आहे. आज "आम्ही केवळ रस्त्यावर बसलो आहोत. पण येणाऱ्या काळात आम्ही मुख्य रस्त्यावर बसू, चक्का जाम करू, भाडेवाढ ही कधीच १५ टक्के होत नाही. २ ते ४ टक्के होते. एसटीचे अध्यक्ष सांगतात की एसटी नफ्यात आहे. पण हे सरकार इतर ठिकाणी पैसे वाटते, प्रलोबन दाखवतात. मग एसटीने काय केलं आहे. एसटीतून सर्वसामान्य माणूस प्रवास करतो. एसटीतून व्यापारी, उद्योजक, अधिकारी प्रवास करत नाहीत. एसटीची भाडेवाड सर्वसामान्यांना सोसणारी नाही. त्यामुळे ही भाडेवाढ रद्द केली पाहिजे. जनतेच्या भावना म्हणून आणि विरोधक म्हणून आम्ही आंदोलन करनार आणि सरकारला भाडेवाढ रद्द करायला भाग पाडू” असा चंग शिवसैनिकांनी बांधलेला दिसला.
        यावेळी वसंतरावजी भोजने, जिल्हाप्रमुख, दिपक चांभारे पाटील तालुका प्रमुख, गजानन ठोसर शहर प्रमुख, राजूसिंग राजपूत विधानसभा संघटक., राजेंद्र काजळे तालुका उपप्रमुख, अक्षय रायपूर तालुका संघटक, शकील जमदार शहर उपप्रमुख, समदभाई कुरेशी शहर उपप्रमुख, पवन गरुड युवासेना तालुका प्रमुख, रामभाऊ थोरबोले कामगार सेना तालुका प्रमुख, हरिदास गनबास कामगार सेना शहर प्रमुख, सैय्यद वसिम किसान सेना शहर प्रमुख, गणेश सुशिर, विश्वनाथ पुरकर, महादेव पवार, यासिन कुरेशी, युवासेना शहर उपप्रमुख, जुबेर खान, नासीर शेख, तुषार पानट, राजा कुरेशी, हुजेफ खान तसेच असंख्य शिवसैनिक हजर होते.

* निर्णयात दुरुस्तीची मागणी : 
        मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ६८ (२) तरतुदीनुसार भाडेवाढ करण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत. एसटी महामंडळाला १४.९५ टक्के भाडेवाढ मंजुरी मिळून ती लागू झाली आहे. सम प्रमाणात भाडेवाढ करण्याऐवजी विषम प्रमाणात भाडेवाढ करण्यात आली आहे. तरी या संदर्भात प्राधिकरणाची पुन्हा बैठक घेऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेना उबाठा तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांनी केली आहे.