* भाईजींच्या मार्गदर्शनातील निवडीचे सर्वस्तरातून स्वागत
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
सहकार, अर्थकारणातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक तसेच समाजशील तथा दातृत्वासाठी सुपरिचित व्यक्तिमत्व डॉ.सुकेश झंवर यांची बुलढाणा अर्बनच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष भाईजींच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत होत असून बुलढाणा अर्बनमधील डॉक्टर पर्वामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुलढाणा अर्बन ही आशिया खंडातील नावाजलेली आणि विश्वासार्ह असलेली पतसंस्था आहे. संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक (भाईजी) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने यशाची शिखरे गाठली. आता भाईजींच्या आदेशानुसार डॉ. सुकेश झंवर यांची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. यापूर्वी ते बुलढाणा अर्बनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने आर्थिक मजबुतीसह तळागाळातील लोकांपर्यत पोहोचण्यात मोठे यश संपादन केले आहे.
डॉ. झंवर यांनी राधेश्याम चांडक यांच्या खांद्याला खांदा लावून संस्थेला आशिया खंडात आदर्श मॉडेल बनवले. त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. बुलढाणा अर्बनच्या कामगिरीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली असून, संस्थेला यशस्वीपणे जागतिक पातळीवर नेले आहे. डॉ. सुकेश झंवर हे लोकांच्या मनातील नेते आहेत. संकटसमयी मदतीचा हात देण्याचा त्यांचा स्वभाव, गरजूंना वेळोवेळी आधार देण्याची वृत्ती, आणि नेतृत्वगुणांमुळे ते देश-विदेशात ओळखले जातात. त्यांच्या निवडीने सभासदांमध्ये संस्थेच्या आणि हितचिंतकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. डॉ. झंवर यांची नियुक्ती ही बुलढाणा अर्बनच्या यशाचा नवा अध्याय ठरणार आहे.