कागदपत्रांची पडताळणी करूनच जन्म प्रमाणपत्र रद्द करावे* नदीम शेख यांची महसुल मंत्री ना.बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

कागदपत्रांची पडताळणी करूनच जन्म प्रमाणपत्र रद्द करावे
* नदीम शेख यांची महसुल मंत्री ना.बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे  मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
           बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरीकांनी आपल्या देशात घुसखोरी करून येथे जन्मप्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी केले होते? सोमय्या यांनी केलेले आरोप आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी चिंतेची बाब आहे. भाजप नेते सोमय्या यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने प्रशासनाने जानेवारी 2021 पासुन 31 डिसेंबर 2024 पर्यंतचे महसुल विभागामार्फत तयार करण्यात आलेले सर्व जन्मप्रमाणपत्र रद्द केले असुन प्रशासनाने सरसकट जन्मप्रमाणपत्र रद्द करण्याऐवजी कागदपत्रांची पडताळणी करूनच जन्मप्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी अल मदिना फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम एस. शेख यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे 9 ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे  मागणी केली आहे.
          निवदेनात म्हटले आहे कि, मागील काळात नव्याने तयार करण्यात आलेल्या जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांची बारकाईने पडताळणी करून बोगस जन्म प्रमाणपत्र बनवणाऱ्यांवर कठोर कार्रवाई करावी. परंतु विदेशी नागरीकांच्या नावाखाली आपल्या देशातील नागरीकांचे जन्म प्रमाणपत्र कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता सरसकट रद्द करणे हे योग्य नाही आहे? ज्या लोकांनी चुकीच्या मार्गाने जन्मप्रमाणपत्र तयार केले, त्यांच्यावर आणि सबंधित अधिकाऱ्यावर कार्रवाई अवश्य करा, परंतु 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत नव्याने तयार केलेले जन्म दाखल्यांची पडताळणी व बारकाईने कागदपत्रांची चौकशी करूनच ते रद्द करण्यात यावे, अशी मागणी अल मदिना फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांनी महसुल मंत्री बावनकुळे यांना दिलेल्या निवेदन नमूद केली आहे.