* जिल्हा काँग्रेस मुख्यालयात 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
चिखली : (एशिया मंच न्युज)
देशाची सत्ता ज्या दिवशी धर्मांध शक्तींच्या हातात जाईल त्या दिवशी लोकशाही संपुष्टात येईल, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते ते आज स्पष्ट दिसत आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी मोठी लढाई लढावी लागली, बलिदान द्यावे लागले. सत्तेत आज धर्मांध शक्ती आहेत आणि लोकशाही, संविधान, सर्व लोकशाही व्यवस्था पायदळी तुडवली जात आहे. लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा सरकारने बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले व लोकशाही व संविधान दिले त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असून झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष तथा माजी आ.राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले.
सर्वप्रथम जिल्हा काँग्रेस मुख्यालय येथील ध्वजारोहण जिल्हाध्यक्ष माजी आ.राहुलभाऊ बोंद्रे यांच्याहस्ते करण्यात आले तसेच राष्ट्रगित होऊन राष्ट्रध्वजास मान्यता देण्यात आली. तद्नंतर गांधी भवन येथील ध्वजारोहण जेष्ठ काँग्रेस नेते अॅड बाबासाहेब भोंडे यांचेहस्ते करण्यात येऊन संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले.
जिल्हा काँग्रेसचे मुख्यालय गांधी भवन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणाले की, देशात लोकशाही व संविधान संपवण्याचे काम सुरु आहे. ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मतदानाचा अधिकार दिला. पण या अधिकारावरच भाजपा निवडणूक आयोगाच्या मदतीने दरोडा टाकत आहे. नुकत्याच पार पडललेल्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेत सर्व पातळ्यांवर घोटाळे करण्यात आले. मतदार याद्या, मतदान व मतमोजणीत घोळ करून भाजपा सत्तेत आणण्यासाठी निवडणूक आयोगाने मदतच केली आहे. काँग्रसने या घोटाळ्याविरोधात आवाज उठवला असून निवडणूक आयोगाकडे मतदार याद्या व वाढलेल्या मतदानाची सर्व माहिती मागितली पण निवडणूक आयोग माहितीच देत नाही. निवडणूक आयोगने आता सर्व डेटा डिलीट करून टाकला आहे, हा प्रकार अत्यंत गंभीर व लोकशाहीसाठी घातक आहे, असे बोंद्रे म्हणाले. यावेळी त्यांनी समस्त जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार धिरजभाऊ लिंगाडे, प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे, उपसभापती आशाताई शिंदे , नंदिनीताई टारपे, जोत्सनाताई जाधव, बानुबी चौधरी, जेष्ठ काँग्रेस नेते बाळाभाऊ भोंडे, संजय पांढरे, चित्रांगण खंडारे, सरचिटणीस सतिष मेहेंद्रे, प्रा. सुनिल सपकाळ सर, गणेश पाटील, तुळशीराम नाईक, रवि पाटील, डाॅ. पुरूषोत्तम देवकर, अध्यक्ष सुनिल तायडे, उपाध्यक्ष नंदुभाऊ शिंदे, अरविंद देशमुख, भुषण मापारी, जाकीर कुरेशी, दिपक रिंढे, विनोद बेंडवाल, मोईन काझी, विठ्ठल चव्हाण, बि. सी. चव्हाण, अमिन टेलर, बबलू कुरेशी, शेख मुजाहीद, एकनाथ चव्हाण, ईरफान भाई, गौतम बेगानी, रविंद्र भाकरे, जिवन जाधव, प्रकाश देशमुख, गौतम मोरे, उत्तम बाजड, सुनिल पनपालिया, बंडूभाउ काळवाघे आदी उपस्थित होते. संचलन प्रा. सुनिल सपकाळ सर यांनी केले.