विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी म्हणून विज्ञान प्रदर्शनी : लव्हाळे
मेहकर : (एशिया मंच वृत्त)
विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी त्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन मेहकर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बी. एन. लव्हाळे यांनी विवेकानंद आश्रम येथे 11 डिसेंबर रोजी केले.
शालेय शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी त्याचप्रमाणे त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी हिवरा आश्रम येथे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी येथील विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे मेहकर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन शिक्षण विभाग पंचायत समिती मेहकर व मेहकर तालुका विज्ञान शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमचे अध्यक्ष आर.बी. मालपाणी हे होते. प्रदर्शनीचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी बी. एन. लव्हाळे यांनी केले. यावेळी गट समन्वयक तथा विस्तार अधिकारी प्रमोद रायमुलकर ,पी.सी. पवार ,संजय दुनगु, केंद्रप्रमुख राजेंद्र वाघ, संजय लामधाडे, सुधाकर वानखेडे, सुरेश चव्हाण ,धोटे, विज्ञान संघटनेचे पदाधिकारी जी.एस ,पाटील, बी.ए. दळवी, व्ही.जे. धोंडगे ,आर. एस. आखरे ,विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोराते,सचिव संतोष गोरे, विष्णुपंत कुलवंत, पुरुषोत्तम आकोटकर मुख्याध्यापक आर.डी.पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्राथमिक गटात 82 उपकरणे, माध्यमिक गटामध्ये 71 उपकरणे तर उच्च माध्यमिक गटांमध्ये 26 उपकरणासह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. सदर प्रदर्शनीचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शनी खुली करण्यात आली होती. या प्रदर्शनीचे आयोजन करीता विवेकानंद विद्या मंदिराचे मुख्याध्यापक आर.डी. पवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डा.ज्ञानेश्वर गाडे यांनी केले.प्रास्ताविक संतोष गोरे,जी.एस.पाटिल ,प्रमोद रायमुलकर यांनी केले.आभार मुख्याध्यापक आर.डी.पवार यांनी मानले.
* इस्त्रोची 'स्पेस ऑन व्हील' प्रयोगशाळा :
येथील विवेकानंद विद्या मंदीर येथे इस्रो व विज्ञान भारती नागपूरच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी 'स्पेस ऑन व्हील' ही चालती फिरती विज्ञान प्रयोगशाळा व्हॅन आली होती. ही प्रयोगशाळा पाहण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांनी गर्दी केली होती. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून अंतराळात चालणा-या विविध घडामोडीबाबत विद्यार्थ्यांना माहीती देण्यात आली.